शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात पोहोचले, पण मद्यधुंद अवस्थेत !

By चैतन्य जोशी | Updated: March 23, 2024 17:36 IST

पोलिसांनी दोन्ही मद्यधुंद डॉक्टरांना बेड्या ठोकून कार जप्त केली.

वर्धा : पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने ही बाब भीम आर्मीचे अंकुश कोचे यांनी निदर्शनास आणून दिली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी वर्धा येथून दोन डॉक्टरांना रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र, ते दोन्ही डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात पोहचले. याबाबतची तक्रार अंकुश कोचे यांनी पोलिसात दिली. पोलिसांनी दोन्ही मद्यधुंद डॉक्टरांना बेड्या ठोकून कार जप्त केली.

डॉ. प्रवेश प्रतापसिंग धमाने रा. यशवंत कॉलनी वर्धा आणि डॉ. माणिकलाल राऊत रा. जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, अशी अटक केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहे. सविस्तर वृत्त असे की, पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खांद्यावर रुग्णालयाचा डोलारा सुरु आहे. २२ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास काही रुण रुग्णालयात आले. वैद्यकीय अधिकारी नसल्याने तेथील परिचारिकेने मी गोळ्या देऊ शकत नसल्याचे सांगितले. याची माहिती अंकुश कोचे यांना मिळाली असता त्यांनी रुग्णालयात जात ही जिल्हा शल्यचिकित्सकांना फोनद्वारे कळविली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉ. धमाने आणि डॉ. राऊत यांना वर्ध्याहून ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दोन्ही डॉक्टर रात्री ९.३० वाजताच्या सुमारास रुग्णालयात मद्यधुंद अवस्थेत पोहचले. एका आठ वर्षीय मुलाला ताप आल्याने त्याची प्रकृतीही अत्यवस्थ होती. कोचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मद्यधुंद डॉक्टरांना उपचार करण्यास रोखले. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना पोलिस ठाण्यात नेत अटक करुन गुन्हा दाखल केला. मद्यपी डॉ. प्रवेश धमाने याच्याविरोधात यापूर्वी देखील मद्यधुंद अवस्थेत रुग्णांवर उपचार केल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशा मद्यपी डॉक्टरांवर कठोर कार्यवाही करण्याची गरज आहे.

कारमध्ये मिळाली दारुची बाटलीडॉ. धमाने आणि डॉ. राऊत हे दोघेही मद्यप्राशन करुन होते. ते एमएच. ३२ वाय. ४०४३ क्रमांकाच्या कारने रुग्णालयात पोहचले होते. त्यांच्याकडून साधे बोलणे देखील होत नव्हते. रुग्णांनी डॉक्टरांची अशी अवस्था पाहून अशा डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी रेटून धरली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कारची पाहणी केली असता कारमध्ये दारुची बाटली आढळून आली. पोलिसांनी दोघांना अटक करुन कारही जप्त केली.

दोन्ही वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद असल्याची तक्रार मिळाली आहे. याप्रकरणाची चौकशी करून कार्यवाही केली जाईल. पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात स्थायी आणि अस्थायी डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. मात्र, आतापर्यंत ते रुजू का झाले नाही, याबाबत माहिती नाही. दोषी डॉक्टरांवर अवश्य कठोर कारवाई केली जाईल.डाँ. कांचन वानोरे, आराेग्य संचालक, नागपूर.

टॅग्स :doctorडॉक्टर