पाण्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: February 2, 2015 23:12 IST2015-02-02T23:12:14+5:302015-02-02T23:12:14+5:30
येथील वणा नदीवरील पंपिग जवळच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. शोध घेतल्यानंतर

पाण्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
वणा नदीवरील पंपिंग स्टेशन येथील घटना
हिंगणघाट : येथील वणा नदीवरील पंपिग जवळच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. शोध घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह सापडला.
प्राप्त माहितीनुसार, नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात दहाव्या वर्गाच्या पुनर्परीक्षेला विद्यार्थी बसले आहेत. आज त्यांना विद्यालयातून परीक्षेचे प्रवेशपत्र मिळविले. प्रवेशपत्र घेतल्यानंतर दुपारी १ वाजताच्या दरम्यान शाळेतील तिघे मित्र वणा नदीवर पोहण्यासाठी गेले. पोहण्याकरिता दप्तर व कपडे काठावर ठेवून ते नदीत उतरले. तिघे ही नदीच्या पात्रात काही अंतर चालून गेल्यावर शेख नौशाद शेख रमजान (१६) रा. संत कबीर वॉर्ड याचा तोल जाऊन पाण्यात गटांगळ्या खात वाहून गेला. त्याच्या सोबतच्या मित्रांनी यावेळी आरडाओरड केली; मात्र जवळ कोणीच नसल्याने मदत मिळाली नाही. शेवटी घाबरलेले हे दोन्ही मित्र निघून गेले. त्यांनी या घटनेची माहिती नदीजवळच्या लोकांना दिल्याने पोलीस व नागरिकांनी नदीकडे धाव घेतली. सहायक पोलीस उपनिरीक्षक नळे यांनी मासेमाऱ्यांच्या मदतीने नदीत मृतदेह शोधला.(तालुका प्रतिनिधी)