शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST

सध्याच्या पीक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी तर तुरीचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील विविध भागांत थांबून थांबून पावसाच्या सरी झाल्याने पीक परिस्थितीही समाधानकारक होती, तर त्यानंतर पाऊसच बेपत्ता झाल्याने, तसेच सध्या ऊनही तापत असल्याने बारा ते पंधरा दिवसांचे अंकुरलेले पीक माना टाकत आहे. 

ठळक मुद्देपाऊस लांबला : शेतकऱ्यांची वाढली चिंता, पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मध्यंतरी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली, तर सध्या जिल्ह्यातील विविध भागांत डवरणीच्या कामाला गती दिली जात आहे. असे असले तरी मागील दहा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने, तसेच पुढील आठ दिवस पाऊस येण्याची शक्यता नसल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे.सध्याच्या पीक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी तर तुरीचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील विविध भागांत थांबून थांबून पावसाच्या सरी झाल्याने पीक परिस्थितीही समाधानकारक होती, तर त्यानंतर पाऊसच बेपत्ता झाल्याने, तसेच सध्या ऊनही तापत असल्याने बारा ते पंधरा दिवसांचे अंकुरलेले पीक माना टाकत आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी रात्रीही शेतात जाऊन उभ्या पिकाला सिंचन करून पीक वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहेत, तर कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या आहेत. रुसलेला वरुणराजा प्रसन्न होत दमदार बरसावा यासाठी ग्रामीण भागात शेतकरी व ग्रामस्थ सध्या धोंडी काढून देवाला साकडे घालत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवडजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी तब्बल १ लाख १३ हेक्टरवर सोयाबीनची लागवड केल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. यापैकी बहुतांश शेतजमिनी कोरडवाहू आहेत. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास १ लाख १३ हजार हेक्टरपैकी अर्धेअधिक सोयाबीन पीक पाण्याअभावी करपण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

काय म्हणतात शेतकरी...

मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची परिस्थिती बिकट झाली आहे. दोन ते तीन दिवस पावसाची प्रतीक्षा केली; पण पाऊस न झाल्याने आता स्प्रिंकलरच्या साहाय्याने सिंचन करून उभे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असले तरी आठवड्यातून काहीच दिवस दिवसाला महावितरण कृषीपंपाला विद्युत पुरवठा करते.- अंगद गिरधर, शेतकरी, जाम.

माझ्याकडे अकरा एकर शेती आहे. त्यापैकी अडीच एकरात सोयाबीन, सात एकरात कपाशी, तर साडेतीन एकरात तुरीची लागवड केली आहे; पण मागील दहा ते बारा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने अडचणीत भर पडली आहे. शेतातील विहिरीत असलेल्या पाण्याच्या जोरावर सध्या उभे पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहे.- अतुल देशमुख, शेतकरी, चिकणी.

माझ्याकडे कोरडवाहू शेती असून, यंदा सोयाबीनची पेरणी केली आहे. पंधरा ते वीस दिवसांचे अंकुरलेले पीक सध्या पाण्याअभावी माना टाकत आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागेल. - एन. बी. कुसरे, शेतकरी, आर्वी.

माझ्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यापैकी चार एकरांत कपाशी, तर एका एकरात तुरीची लागवड केली आहे; पण मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अंकुरलेल्या पिकांची परिस्थिती बिकट आहे. आज ना उद्या दमदार पाऊस येईल अशी आशा असून सध्या आकाशाकडे नजरा लागल्या आहेत.- गजानन डफरे, शेतकरी, चिकणी.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती