शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त ‘धाम’ करेल भविष्यातील जलसंकटावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:46 IST

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध तलावांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. परंतु, वर्धा शहरासह परिसरील १५ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम जलाशयाला गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन कुठलेही पाऊल उचलताना दिसत नाही.

ठळक मुद्देसाडेतीन दशकांत सर्वाधिक गाठला तळ : गाळाचा शेतकऱ्यांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध तलावांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. परंतु, वर्धा शहरासह परिसरील १५ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम जलाशयाला गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन कुठलेही पाऊल उचलताना दिसत नाही. विशेष म्हणजे मागील साडेतीन दशकाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सर्वात जास्त तळ या प्रकल्पाने गाठला आहे. धाम प्रकल्प गाळमुक्त झाल्यास तो भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी फायद्याचाच ठरेल. परिणामी, वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.प्राप्त माहितीनुसार, ३२८.६०० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या धाम प्रकल्पात सध्या केवळ ८.३८ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस न झाल्याने तसेच सदर जलाशयही पाहिजे तसा भरला नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. परिणामी, वर्धा शहरासह परिसरातील १५ गावांमध्ये यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येते. उल्लेखनिय म्हणजे मागील ३३ वर्षांपासून धाम प्रकल्पाची १.९० मिटरने उंची वाढविण्याचा विषय शासनदरबारी रेंगळत आहे. या प्रकल्पाची उंची वाढीच्या विषयाला वेळीच प्रत्यक्ष कृतीत आणले असते तर सध्या या जलाशयात पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात राहिला असता. परंतु, जलाशयाच्या उंची वाढविण्याचा विषय वेळीच मार्गी न लागण्याला लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षी धोरणच कारणीभूत ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आदी योजनेच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामे होत आहे. इतकेच नव्हे तर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कारही वर्धा जिल्ह्यातील गावांना मिळाला. मात्र, विविध सामाजिक संघटना श्रमदानातून तसेच शासकीय अधिकारी सदर योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाला गाळमुक्त करण्याकडे पाठच दाखवित असल्याचे चित्र आहे. धाम जलाशयाने मागील साडे तीन दशकाच्या तुलनेत यंदा सर्वात जास्त तळ गाठला आहे. त्यामुळे यंदा या प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात गाळही काढणे प्रशासनाला शक्य होऊ शकणार असून प्रत्यक्ष कृती होईल काय याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी धाम प्रकल्प गाळमुक्त होणे गरजेचे आहे. धाम जलाशयातील गाळ काढण्यास सुरूवात झाल्यावर तो गाळ परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकून घ्यावा यासाठी आपण स्वत: पुढाकार घेऊन त्या दिशेने काम करू. इतकेच नव्हे तर धाम गाळमुक्त व्हावा यासाठी आपण पं.स.च्या मासिक सभेत सदर प्रश्न मांडणार आहे.- नीतीन अरबट, पं.स. सदस्य, आर्वी.सध्या वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. जर धामची उंची वेळीच वाढविली असती तर नागरिकांवर ही परिस्थिती ओढावली नसती. धाम जलाशयाला गाळमुक्त करण्यासाठी तसेच सदर प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी येत्या आठ दिवसात जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल न उचलल्यास युवा परिवर्तन की आवाज संघटना नागरिकांना सोबत घेऊन महाकाळी येथील धाम प्रकल्पातच तीव्र आंदोलन करेल.- निहाल पांडे, संस्थापक अध्यक्ष, युवा परिवर्तन की आवाज संघटना.