बोअर मशीनची पुली डोक्यावर पडून इसम जागीच ठार
By Admin | Updated: March 4, 2017 00:35 IST2017-03-04T00:35:20+5:302017-03-04T00:35:20+5:30
शेतात सुरू असलेल्या बोअरच्या बाजूला बसून असलेल्या एका शेतकऱ्याच्या डोक्यावर बोअरची पुली पडली.

बोअर मशीनची पुली डोक्यावर पडून इसम जागीच ठार
धावडी येथील घटना
कारंजा (घाडगे) : शेतात सुरू असलेल्या बोअरच्या बाजूला बसून असलेल्या एका शेतकऱ्याच्या डोक्यावर बोअरची पुली पडली. यात तो जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास धावडी (मोठी) येथे घडली. उत्तम मारोतराव फरकाडे असे मृतकाचे नाव आहे.
धावडी (मोठी) या गावात जगन्नाथ किनकर यांच्या शेतात बोअर करण्याचे काम सुरू असताना शेत मालकाला भेटण्यासाठी उमरी येथील शेतकरी उत्तम मारोतराव फरकडे रा. उमरी आले. बोअर मशीनचे शेजारी बसले असता जमिनीतील पाईप वर काढणारी पुली अचानक उत्तम यांच्या डोक्यावर पडली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या उत्तम यांचा जागीच मृत्यू झाला. घटना स्थळी असणाऱ्यांनी त्यांना लगेच कारंजा ग्रामीण रुग्णालयात नेले असताना त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.(तालुका प्रतिनिधी)
भेटीला जाणे जीवावर बेतले
बोअर सुरू असताला केवळ शेतमालकाला भेटण्याकरिता गेलेल्या उत्तम फरकाडे यांच्यावर काळाने घाला घातल्याची चर्चा आहे.