शहरातील हॉटेलमध्येही दारूविक्री

By Admin | Updated: March 27, 2015 01:25 IST2015-03-27T01:25:42+5:302015-03-27T01:25:42+5:30

शहरात हॉटेलमध्येही दारूविक्री होत असल्याचे उघड झाले आहे़ अमरावती-नागपूर महामार्गावर पांडे पेट्रोलपंपाजवळ एका युवकास ...

Drink liquor in the hotel also | शहरातील हॉटेलमध्येही दारूविक्री

शहरातील हॉटेलमध्येही दारूविक्री

कारंजा (घा़) : शहरात हॉटेलमध्येही दारूविक्री होत असल्याचे उघड झाले आहे़ अमरावती-नागपूर महामार्गावर पांडे पेट्रोलपंपाजवळ एका युवकास मोटारसाईकलला पिशव्या बांधून त्यात दारू आणताना अटक केली़ यात ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ शनिवारच्या या कारवाइने हॉटेलमधील दारूविक्री उघड केली़ ही कारवाई ठाणेदार विनोद चौधरी यांच्यासह शिपाई लिलाधर उकंडे, प्रविण बोधाने यांनी केली.
कित्येक दिवसांपासून शहरात छुप्या मार्गाने दारूविक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना होती; पण झडतीमध्ये दारू सापडत नव्हती़ पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरिक्षक यांनी महामार्गावर लक्ष केंद्रीत केले़ यात मोटर सायकल क्ऱ एम.एच. ३२ एऩ ६३०० ने राजेश बोंडे वाहनाला दोन्ही बाजूने बांधून असलेल्या थैल्यांमध्ये ९० मिलीच्या दारूच्या शिशा घेऊन येत होता़ तपासणी केली असता सदर मुद्देमाल आढळून आला़ ही विदेशी दारू एका हॉटेलमध्ये विक्रीकरिता येत असल्याची माहितीही सुत्रांनी दिली़ या कारवाईत पोलिसांनी २६ हजार ७०० रुपयांची विदेशी दारू व मोटर सायकल असा ७६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ या प्रकरणात राजेश बोंडेसह बाळू भांगे, प्रविण भिंगारे यांच्याविरूद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले़(शहर प्रतिनिधी)

Web Title: Drink liquor in the hotel also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.