शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

मद्यप्राशन करून ‘ढगा’ येथे जाल तर फौजदारी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 15:19 IST

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याने त्याच्या व इतरांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी खरांगणा पोलिसांनी नवी मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीचे औचित्य साधून आर्वी तालुक्यातील ढगा येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याने त्याच्या व इतरांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी खरांगणा पोलिसांनी नवी मोहीम हाती घेतली.वाहन चालक किंवा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आढळून येईल त्याच्याविरुद्ध खरांगणा फौजदारी कारवाई करणार आहे.

वर्धा - महाशिवरात्रीचे औचित्य साधून आर्वी तालुक्यातील ढगा येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. काही जण हा प्रवास पूर्ण करताना मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याने त्याच्या व इतरांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी खरांगणा पोलिसांनी नवी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम पोलिसांकडून राबविताना वाहनचालक मद्यप्राशन करून आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी करून ‘ब्रिथ अ‍ॅनालायझर’ द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. जो वाहन चालक किंवा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आढळून येईल त्याच्याविरुद्ध खरांगणा फौजदारी कारवाई करणार आहे. ही मोहीम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या प्रत्यक्ष हजेरीत राबविण्यात येणार असून या मोहिमेमुळे मद्यधुंद वाहनचालकांच्या अडचणीत चांगलीच भर पडणार आहे.

पोलिसांसह 100 गृहरक्षक देणार खडा पहारा

ढगा येथे येणाऱ्यांवर दोन पोलीस अधिकाऱ्यांसह 50 पोलीस कर्मचारी आणि 50 गृहरक्षक दलाच्या जवानांची करडी नजर राहणार आहे. ठिकठिकाणी नाकेबंदी करून कुणी मद्यप्राशन तर करून नाही ना याची शहानिशा ब्रिथ अ‍ॅनालायझरद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.

वाहतूक केली वळती

ढगा येथे दर्शनासाठी येणाऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये. शिवाय अनुचित घटना टाळता यावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन वर्धेकडून कारंजाकडे आणि कारंजाकडून वर्धेकडे येणाऱ्या जड वाहनांचा मार्ग महाशिवरात्री निमित्त एक दिवसासाठी बदलविण्यात आला आहे. ऐरवी जड वाहन खरांगणा होत कारंजाच्या दिशेने जातात. शिवाय कारंजाकडून वर्धेकडे येतात. असे असले तरी केवळ रापमच्या बसेसलाच खरांगणा होत जाता येणार आहे. कारंजाकडून वर्धेकडे येणाऱ्या व वर्धेकडून कारंजाकडे जाणाऱ्या इतर जड वाहनांना माळेगाव (ठेका) मार्गे ये-जा करावी लागणार आहे.जाताना खरांगणाच्या नव्या पुलावरून तर येताना जुन्या पुलावरून करावा लागेल प्रवास

वाहतुकीची कोंडी होऊ नये या हेतूने खरांगणा पोलिसांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आर्वी व वर्धेकडून जाताना वाहनचालकांना आपले वाहन खरांगणा येथील नवीन पुलावरून तर परतीचा प्रवास करताना गावातील जुन्या पुलावरून न्यावे लागणार आहे.

मद्यधुंद अवस्थेत आढळून येणाऱ्या व्यक्तीवर खरांगणा पोलिसांकडून म.दा.का.च्या कलम 85 अन्वये तर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना आढळून येणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध एम.व्ही. अ‍ॅक्टच्या कलम 185 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

- संतोष शेगावकर, ठानेदार, खरांगना.

टॅग्स :PoliceपोलिसMahashivratriमहाशिवरात्री