शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टिळक पुतळ्याच्या अस्तित्वावरच ओरखडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणाºया गोल भाजी बाजारात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा अर्धाकृती पुतळा पालिकेच्या वतीने कित्येक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. या पुतळ्यालाच हल्ली घाण, कचऱ्याने विळखा घातलेला आहे. भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडकी फळे आणि भाजीपाला व अन्य प्रकाराचा कचरा पुतळा परिसरातच आणून टाकला जातो. या परिसरातील इतर व्यावसायिकही गोल बाजाराच्या मागील परिसरात प्लास्टिक व अन्य प्रकारचा कचरा आणून टाकतात.

ठळक मुद्देशहरात सर्वत्र स्वच्छतेचे तीन-तेरा : नगरपालिकेचा स्वच्छता विभाग घेतोय डुलक्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ सर्वेक्षणात केवळ नावालाच स्वच्छता करून क्रमांक मिळविणाऱ्या नगरपालिकेच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेने कळस गाठला आहे. गोल भाजी बाजाराला घाणीने विळखा घातल्याने टिळकांच्या पुतळ्याच्या अस्तित्वावरच ओरखडे ओढले जात आहेत. पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या संवेदना मात्र बोथट झाल्याचे दिसून येत आहे.टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणाºया गोल भाजी बाजारात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा अर्धाकृती पुतळा पालिकेच्या वतीने कित्येक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. या पुतळ्यालाच हल्ली घाण, कचऱ्याने विळखा घातलेला आहे. भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडकी फळे आणि भाजीपाला व अन्य प्रकाराचा कचरा पुतळा परिसरातच आणून टाकला जातो. या परिसरातील इतर व्यावसायिकही गोल बाजाराच्या मागील परिसरात प्लास्टिक व अन्य प्रकारचा कचरा आणून टाकतात. हा कचरा सडल्यानंतर या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. व्यावसायिकांकडून टाकल्या जाणाºया सडक्या, भाजी फळांवर मोकाट जनावरे उच्छाद घालत असतात. मात्र, पालिकेकडून परिसराची नियमित स्वच्छता केली जात नसल्याचे येथील चित्र पाहिल्यावर निदर्शनास येते. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच पालिकेकडून हा परिसर स्वच्छ केला जातो. इतरवेळी स्वच्छतेकडे कानाडोळा केला जातो. येथे टाकल्या जाणाºया कचऱ्यात प्लास्टिकचे मोेठे प्रमाण असल्याने प्लास्टिकबंदीचा फज्जा झालेला पाहायला मिळतो. शहरातील गोल बाजारात भाजी खरेदी करण्याकरिता येणाºया ग्राहकांची मोठी संख्या आहे. या ग्राहकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गोलबाजाराचे मागील लोखंडी प्रवेशद्वार कधीचेच मोडकळीस आले. परिणामी, मागील भागातून जनावरे पुतळा परिसरात शिरतात आणि घाण करतात. मात्र, पालिकेकडून पुतळ्याच्या देखभाल, सुरक्षा आणि कायमस्वरूपी स्वच्छता राखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. महादेवपुरा, शहर पोलिस ठाणे परिसर, हवालदारपुरा, मालगुजारीपुरा, रामनगर, श्रावणे ले-आउटसह शहरातील इतर वॉर्डातही कचºयाचे डोंगर पाहायला मिळतात. पालिकेचा स्वच्छता विभाग मात्र, डुलक्या घेत असल्याचे चित्र आहे.नागरिकांकडून पुतळा परिसरातच केली जाते लघुशंकापुतळा परिसरातच भाजी, फळ विक्रेत्यांकडून हातगाड्या उभ्या केल्या जातात. सडकी भाजी, फळे आणि अंड्याची टरफले आणून टाकतात. कागद व प्लास्टिक पिशव्यांची जाळून विल्हेवाट लावली जाते. यामुळे प्रदूषणालाही हातभार लागत आहे. शौचालयासाठी पुतळा परिसराचा वापर केला जातो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य येथे पसरले असून पुतळ्याच्या अस्तित्वावरच ओरखडे ओढले जात आहेत.स्वच्छ सर्वेक्षणाच्या फलक परिसरातच अस्वच्छता!शहरातील विविध भागात नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी स्वच्छ सर्वेक्षणाचे फलक लावण्यात आले आहे. कित्येक ठिकाणी या फलकांच्या पायथ्याशी आणि परिसरातच अस्वच्छता पसरलेली असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. त्यामुळे स्वच्छता विभाग करतो तरी काय, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :dumpingकचरा