नालवाडी चौकातून दारूसाठा जप्त

By Admin | Updated: June 9, 2014 23:48 IST2014-06-09T23:48:13+5:302014-06-09T23:48:13+5:30

येथील नालवाडी चौक परिसरात एका कारणे मोठय़ा प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून माहितीत असलेल्या कारची झडती घेतली

Drainage seized from Nalwadi Chowk | नालवाडी चौकातून दारूसाठा जप्त

नालवाडी चौकातून दारूसाठा जप्त

वर्धा  : येथील नालवाडी चौक परिसरात एका कारणे मोठय़ा प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून माहितीत असलेल्या कारची झडती घेतली असता यात दारूसाठा आढळून आला. यावेळी कारमधील एक आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता अटकेत असलेल्या दुसर्‍या आरोपीच्या सहकार्याने त्याला सकाळी अटक करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी दारू व कारासह एकूण दोन लाख २५ हजार १६0 रुपयांचा माल हस्तगत केला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही दारूविक्रेत्यांची नावे रियाज बेग बब्बु बेग मिर्झा रा. गोंडप्लॉट व अमित जयस्वाल रा. दहेगाव (गोसावी) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नालवाडी चौकात मोठय़ा प्रमाणात दारू येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एमएच ३१ सीपी ५३६७ क्रमांकाची कार अडवून तिची झडती घेतली. यात विदेशी कंपनीच्या दारूच्या मोठय़ा प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. शिवाय यातील अमित जयस्वाल याने कारवाई दरम्यान पोलीस कर्मचार्‍याला धक्का देत पळ काढला. तर घटनास्थळी रियाज बेग बब्बु बेग मिर्झा याला अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दारूसाठय़ासह कार व मोबाईल असा एकूण २ लाख २५ हजार १६0 रुपयांचा माल जप्त केला. या कारवाईच्यावेळी पसार झालेल्या अमित जसस्वाल याला रविवारी सकाळी अटक करण्यात आली. या दोघांवर मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार बुराडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक बाबरे, भगवान बावने, देवराव येणकर, सचिन खैरकार,वैद्य व डांगे यांनी केली.(प्रतिनिधी)

Web Title: Drainage seized from Nalwadi Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.