डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन कधी होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 06:12 IST2017-10-26T06:12:00+5:302017-10-26T06:12:04+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन कधी होणार ?
वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे विभाजन करून पूर्व विदर्भात नवे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या; पण याबाबतचा शासन निर्णय अजूनही झालेला नाही.
विदर्भात अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. विदर्भात कृषी संशोधन केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. अनेक जिल्ह्यांत नवीन कृषी महाविद्यालये स्थापन झाली आहेत. त्यामुळे पंदेकृ विद्यापीठावरील भार प्रचंड वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल, सिंदेवाही व गडचिरोली मुख्यालयात कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
आघाडी सरकारच्या काळात गडचिरोली या मागास जिल्ह्यात तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात आले.
त्याचवेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून गडचिरोली येथे गोेंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले.
>पूर्व विदर्भातील कृृषी क्षेत्रातील संशोधनात्मक काम वाढविण्याच्या दृष्टीकोनातून चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत नवे विद्यापीठ स्थापन होण्याच्या दृष्टीने शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे.
- अरुण हरडे, अध्यक्ष, केवलराम हरडे कृषी महाविद्यालय