डॉ. आंबेडकर चौकात मूकमोर्चाचा समारोप
By Admin | Updated: October 24, 2016 00:27 IST2016-10-24T00:27:53+5:302016-10-24T00:27:53+5:30
मूकमोर्चा मुख्य मार्गाने जात सोशालिस्ट चौक मार्गे बजाज चौकातून डॉ. आंबेडकर चौकाकडे निघाला.

डॉ. आंबेडकर चौकात मूकमोर्चाचा समारोप
वर्धा : मूकमोर्चा मुख्य मार्गाने जात सोशालिस्ट चौक मार्गे बजाज चौकातून डॉ. आंबेडकर चौकाकडे निघाला. बजाज चौकात आर्वी नाक्याप्रमाणेच गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी सर्वांचे लक्ष वेधणारी होती. बजाज चौकातून हा मोर्चा इतवारा चौकमार्गे समारोप होणार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला. येथे साक्षी घुडे आणि अनुश्री नागपूरे या दोन युवतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
यानंतर या मूकमोर्चाचे रुपांतर एका भव्य सभेत झाले. या सभेला कोण्या नेत्याने नव्हे तर चार युवतींनी मार्गदर्शन केले. यात रूतूजा मिसाळ, आयुषी चव्हाण, श्रद्धा बारोकर व आकांक्षा काकडे यांचा समावेश होता. त्यांनी मराठा-कुणबी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात हा मोर्चा असल्याचे यावेळी सांगितले. मोर्चाच्या प्रारंभापासून तर समारोपापर्यंतच्या कार्यक्रमाचे संचालन यवतमाळ येथील कैलास राऊत यांनी केले. मूकमोर्चात सहभागींचे आभार तुषार उमाळे यांनी मानले. राष्ट्रगीताने मूकमोर्चाचा समारोप झाला.
दोन ठिकाणी ड्रोन कॅमेरे
मूकमोर्चा निघणार असलेल्या मैदानावर आणि शिवाजी चौक येथे आयोजकांच्यावतीने ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. ती वर्धेकरांकरिता आकर्षणाचे केंद्र ठरली. ड्रोण कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मूकमोर्चामध्ये जमलेल्या जनसमूदायाचे चित्रण करण्यात आले. शिवाजी चौकातील ड्रोन कॅमेरा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. सर्वांच्या नजरा कॅमेऱ्याकडे लागल्या होत्या.