मृत्यूप्रकरणी पतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
By Admin | Updated: October 10, 2015 02:35 IST2015-10-10T02:35:46+5:302015-10-10T02:35:46+5:30
घराच्या सफेदीकरिता खिशातून परस्पर पैसे काढण्यावरून झालेल्या वादात पत्नीला बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला.

मृत्यूप्रकरणी पतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
वर्धा : घराच्या सफेदीकरिता खिशातून परस्पर पैसे काढण्यावरून झालेल्या वादात पत्नीला बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची आष्टी पोलिसांनी चौकशी केली असता संजय वनवाश्या धुर्वे (३५) रा. किन्हीआबाद याच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संजयने गावातून पळ काढला.
पोलीस सूत्रानुसार, संजय व त्याची पत्नी रेखा या दोघांत खिशातून पैसे काढण्यावरून वाद झाला होता. यात संजयने तिला मारहाण केली. तसेच दगड फेकून मारल्याने ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. ही घटना २७ सप्टेंबर २०१४ रोजी किन्ही (आबाद) येथे घडली. त्यावेळी आष्टी पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास केला असता संजयने मारहाण केल्यामुळे रेखाचा मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट झाली. यावरून त्याच्यावर कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला तपास सुरू आहे.(स्थानिक प्रतिनिधी)