शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय; दगडाने ठेचून पत्नीची केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

आरोपी इमरान खान हा भूगाव ते नांदेड मालवाहू ट्रक चालवायचा. तो मूळचा पुलगाव येथील रहिवासी असून मागील दहा ते १५ वर्षांपासून कुटुंबासह भूगाव येथे वास्तव्यास होता. मृतक कैकशा ही घरी असताना आरोपी पती इमरान हा घरी आला. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ केली. विवाहितेने शिवीगाळ करण्यास हटकले असता रागाच्या भरात आरोपी पती इमरान याने रस्त्याकडेला असलेला दगड उचलून कैकशाचे डोके ठेचून तिची हत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या डोक्यावर दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास भूगाव येथे घडली. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केल्याची माहिती आहे. कैकशा इमरान खान (२१) रा. भूगाव असे मृतक महिलेचे नाव असून आरोपी इमरान खान याला सावंगी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी इमरान खान हा भूगाव ते नांदेड मालवाहू ट्रक चालवायचा. तो मूळचा पुलगाव येथील रहिवासी असून मागील दहा ते १५ वर्षांपासून कुटुंबासह भूगाव येथे वास्तव्यास होता. मृतक कैकशा ही घरी असताना आरोपी पती इमरान हा घरी आला. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ केली. विवाहितेने शिवीगाळ करण्यास हटकले असता रागाच्या भरात आरोपी पती इमरान याने रस्त्याकडेला असलेला दगड उचलून कैकशाचे डोके ठेचून तिची हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून असलेल्या पत्नीला पाहून आरोपीने तेथून पळ काढला. याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली असता सावंगी पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ तपासचक्र फिरवून आरोपी इमरान खान याला ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावंगी येथील रुग्णालयात पाठविला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस