शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

टीव्हीची ओळख देणारे दूरदर्शन होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:40 PM

टेलीव्हीजनची ओळख देणारे दूरदर्शन आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेत कमी पडल्याने शासनाने काही भागात त्याचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वर्धेतील तीनही केंद्र बंद करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात तीन केंद्र : जानेवारीच्या अखेरीस प्रक्षेपण बंद

पुरूषोत्तम नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : टेलीव्हीजनची ओळख देणारे दूरदर्शन आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेत कमी पडल्याने शासनाने काही भागात त्याचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वर्धेतील तीनही केंद्र बंद करण्यात येत आहे. तर राज्यातील २७६ केंद्रांवर गंडांतर येणार आहे. यामुळे कधी मालिकांची आठवडाभर वाट बघण्याची हुरहुर लावणारे दूरदर्शन आज टिव्हीच्या पडद्याआड होणार आहे.२२ वर्षापूर्वी आर्वी शहरात सुरू झालेले दूरदर्शन केंद्र येत्या ३१ जानेवारीला बंद होणार आहे. याची माहिती होताच अनेकांकडून दूरदर्शनवरील अनेक मालिका आणि कार्यक्रमांना उजाळा देण्यात आला. टेलीव्हीजनची ओळख देणारे दूरदर्शन बंद होणार असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटला आहे. मनोरंजनाचे साधन असणारे दुरदर्शन केंद्र बंद करण्याचे आदेश मुंबईहून या तीनही केंद्रांवर धडकले आहेत.आर्वी शहरात न्यायालयाच्या समोरील नगर पालिकेच्या जागेवर इमारतीत २५ नोव्हेंबर १९९५ मध्ये तत्कालीन केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री माधवराव सिंधिया यांच्या हस्ते भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष वसंतराव साठे व खा. रामचंद्र घंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यलय सुरू झाले. यासह जिल्ह्यात दूरदर्शन केंद्रामुळे वर्धा आणि पुलगाव येथेही दूरदर्शनचे कार्यालय उघडण्यात आले. या दूरदर्शनवरून प्रकाशित होणारे कार्यक्रमा प्रारंभीच्या काळात युवा पिढीला मार्गदर्शन करणारे ठरले.रामायण, महाभारत, हनुमान, मराठी रसिकांची फेम असलेले चालता बोलता व आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात, रंगोली, शैक्षणिक कार्यक्रम, बायोस्कोप अशी अनेक हिंदी, मराठी सिरीयलसह इतर कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत होते. शेतीकरिता असलेला आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम शेतकरी आवर्जून बघत होते. शिवाय मराठीचे बातमीपत्र बघणारे आजही आहेत.हेच दूरदर्शन केंद्र हे २२ वर्षानंतर बंद होणार आहे. ग्रामीण भागातील गोरगरिब जनता पैसा खर्च करुन डिश टी.व्ही., केबल घरी घेऊ शकत नाही. या मोफत दुरदर्शन सेवेचा आनंद घेत आहेत. यामध्ये जवळपास आर्वी परिसरातील २०० गावातील २ लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांवर अन्याय केल्याच्या प्रतिक्रीया नागरिक देत आहेत. जिल्ह्यातील आर्वी, वर्धा, पुलगाव ही सर्वच दूरदर्शन केंद्र ३१ जानेवारीला बंद होत असल्याने या येथील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दूरदर्शन केंद्र सुरू राहण्याकरिता जातीने प्रयत्न करावे अशी मागणी जोर धरत आहे.एफएमही होणार बंददूरदर्शनची वर्धा जिल्ह्यात केवळ टेलीव्हीजनची सेवा नाही तर त्यांच्यावतीने एफएमचीही सेवा पुरविण्यात येत होती. या निर्णयामुळे ही सेवाही बंद होणार आहे. यामुळे रात्री एफएमवर विविध कार्यक्रमाचा आनंद घेणाºया वर्धेकर नागरिकांना या सेवेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे.डिजिटलायझेशनमध्ये वर्धेचा समावेश होणे अपेक्षितडिजीटलायझेशनच्या नावाखाली शासनाने दूरदर्शन केंद्र बंद करण्याचा घाट घातला आहे. वर्धेत बंद होत असलेल्या इतर नाही तर किमान जिल्हास्थळ असलेले केंद्र सुरू ठेवून येथे डिजीटलाईज सेवा देणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. वर्धेतील सर्वच केंद्र बंद करण्यात येत असल्याने या भागातील नागरिकांना शासनाच्या या सेवेपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.दुरदर्शनला आकाशवाणीचे स्वरुप द्यादूरदर्शन केंद्र बंद न करता आर्वीच्या केंद्रावरुन आकाशवाणीचे डिजिटलायझेशन केल्यास अनेक कार्यक्रमासह येथील जाहिराती ग्रामीण भागातील लोककला कार्यक्रम व समाज प्रबोधनपर कार्यक्रम या केंद्रावर प्रसारण होऊ शकते. त्यामुळे या केंद्राला आकाशवाणी केंद्राचे स्वरुपसोबतच आर्थिक सहकार्य मिळू शकते अशी मागणी जनतेची आहे.