लहानुजी महाराज मंदिराची दानपेटी फोडली
By Admin | Updated: January 4, 2016 04:20 IST2016-01-04T04:20:48+5:302016-01-04T04:20:48+5:30
श्रीक्षेत्र टाकरखेड येथील लहानुजी महाराज समाधी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून जवळपास चार लाखांची रोख

लहानुजी महाराज मंदिराची दानपेटी फोडली
आर्वी : श्रीक्षेत्र टाकरखेड येथील लहानुजी महाराज समाधी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून जवळपास चार लाखांची रोख लंपास केली. ही घटना रविवारी उघड झाली. या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
पोलीस सुत्रानुसार, नित्याप्रमाणे पहाटेच्या सुमारास पहाटे पुजारी नितीन भालतडक पुजा करायला आले असता त्यांना हा प्रकार दिसला. लगेच त्यांनी चौकीदार व इतरांना या प्रकरणाची माहिती देत पोलिसांना कळविले. ठाणेदार शैलेश साळवी यांच्यासह वर्धा येथील ठसे तज्ज्ञ, गुन्हे अन्वेशन विभाग व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करताना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. यात चोरटे पांढरा ड्रेस घालून चेहऱ्याला बांधून मागच्या दाराची साखळी तोडून समाधी मंदिरात घुसल्याचे दिसले. त्यांनी प्रथम महाराजाच्या पादुका उचलल्या, त्या चांदीच्या असल्याने त्यांनी तश्याच ठेवून दिल्याचे दिसले. त्यानंतर दोघांनी दानपेटी उचलली. सभा मंडपाच्या बाहेर नेऊन फोडली व पोबारा केला. आतमध्ये प्रवेश करताना यास चोरट्यांनी बाहेरिल सीसीटीव्ही कॅमेरा फोडल्याचेही दिसून आले. या घटनेची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)
तुरीच्या ५० पेट्या पळविल्या
४वर्धा- विजयगोपाल शिवारातून अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास तुरीच्या ५० पेट्या लंपास केल्या. ही घटना रविवारी उघडकीस आली. याबाबत शेतकरी बंडूजी भांगे यांनी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनी स्वत:च्या शेतात तूरीच्या पेट्या बांधून ठेवल्या होत्या. दरम्यान चोरट्यांनी त्या लंपास केल्या. यात त्यांचे अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला.