वर्धा : ‘आनंदाचे डोही आनंद तरंग..’ असे म्हणत आयुष्याचा निवांतक्षणी घडलेल्या इतिहासाचे सिंहावलोकन करीत नव्याने आनंद शोधण्यासाठी आणि जीवनाला चालना देऊन प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे तरंग निर्माण करण्यासाठी आनंदीकट्टा कार्यक्रम घेण्यात आला. मनातील जळमटे दूर होत भावनांना वाट मोकळी झाली. ज्येष्ठ समाज सेविका सुमन बंग, शांता पावडे, संतोष वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदीकट्टा रंगला. याप्रसंगी संध्या देशमुख यांनी आपल्या घराच्या आणि मनाच्या भिंती व्हॉटसअप आणि फेसबुकच्या जगात मुक्या झाल्या ही खंत व्यक्त करून, ज्येष्ठांच्या कला गुणांना मंच मिळावा, यासाठी आनंदीकट्टा या कलामंचाला आपण सुरुवात केली आहे असे सांगून गुरुपोर्णिमेनिमित्त गुरुशिष्य परंपरा आणि त्यांचे नाते कसे असावे याबाबत विचार व्यक्त केले. यावेळी ज्ञानदा वानखेडे, तनया वानखेडे, सर्वदा जोशी, भारती कुबडे, अश्विनी कबाडे, जान्हवी सालोडकर, तन्वी गलांडे, अर्कदीप नाग, अनिशा बडगे, रोमित गलांडे हा विद्यार्थ्यांना गुणगौरव पुरस्कार देण्यात आला. वासुदेव गोंधळे, मनोहर देऊळकर, ज्योत्सना ढुमणे, चंदा कबाडे, सुमन कोटस्याने यांनी भजन, शोभा कदम प्रभाकर पुसदेकर यांनी कला सादर केल्या. संचालन ज्योती भगत यांनी केले. कार्यक्रमाला हार्मोनियमची संगत नरेंद्र माहुलकर, तबला संगत राम वानखेडे आणि मंजिरांची संगत विठ्ठल दुर्गे यांनी केली.(शहर प्रतिनिधी)
आनंदी कट्ट्यात झाली मने मोकळी
By admin | Updated: August 2, 2015 02:40 IST