राष्ट्रीय कार्याला लावला रक्तदात्यांनी हातभार

By Admin | Updated: July 2, 2014 23:23 IST2014-07-02T23:23:47+5:302014-07-02T23:23:47+5:30

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे़ शिवाय राष्ट्रीय कार्य म्हणूनही रक्तदानाकडे पाहिले जाते़ आपण कुणासाठी काही करू शकतो, या भावनेतून केलेले रक्तदान तुमच्या अजाणतेपणी कुणाचे तरी जीवन वाचविण्याचे काम

Donation by donors donated to national work | राष्ट्रीय कार्याला लावला रक्तदात्यांनी हातभार

राष्ट्रीय कार्याला लावला रक्तदात्यांनी हातभार

श्रद्धेय जवाहरलाल दर्डा जयंती : रक्तदान शिबिरास युवकांचा प्रतिसाद
वर्धा : रक्तदान हे श्रेष्ठदान आहे़ शिवाय राष्ट्रीय कार्य म्हणूनही रक्तदानाकडे पाहिले जाते़ आपण कुणासाठी काही करू शकतो, या भावनेतून केलेले रक्तदान तुमच्या अजाणतेपणी कुणाचे तरी जीवन वाचविण्याचे काम करते़ याच भावनेतून रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्याला रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे हातभार लावला़
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लाईफ लाईन रक्तपेढीच्या सहकार्याने बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत न्यू आर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले़ शिबिराचे उद्घाटन न्यू आर्टस् कॉमर्स व सायन्सचे प्राचार्य कडवे यांच्या हस्ते करण्यात आले़
विज्ञान कितीही पुढे गेले, निर्मितीमध्ये विलक्षण प्रगती केली असली तरी जीवनावश्यक असलेले रक्त निर्माण करण्याची शक्ती कुणासही अवगत नाही. यासाठी रक्तदान हा एकमेव पर्याय आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाला तरी जीवनदान मिळू शकते़ यामुळे रक्तदान करण्याची संधी सोडणे म्हणजे मोठ्या दानापासून वंचित राहणे होय.
लोकमतच्या या आवाहनामुळे आणि श्रद्धेय बाबूजींच्या जयंतीचे औचित्य असल्याने अनेकांनी या राष्ट्रीय कार्यात हिरहिरीने सहभाग घेतला़ रक्तदानाकरिता सकाळपासूनच गर्दी झाली होती़ यात युवकांची तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून आली़ रक्तदानाचे महत्त्व युवकांना समजल्याचे शिबिरातील उपस्थितीवरून दिसून आले़
रक्तदान शिबिरात मोहन मानमोडे, शूभम वालूरकर, अक्षय ढुमणे, धनंजय नाखले, प्रतीश चौधरी, मयूर राऊत, अनिल वांदुरकर, योगेश महाजन, निलेश राऊत, शिरीष खैरकर, सूरज निमजे, सोनम ढेंगरे, उमेश पाटील यांच्यासह युवक-युवतींनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्य पार पाडले़
रक्तसंकलनाचे कार्य लाईफ लाईनच्या डॉ़ प्रीती बांबल यांच्या मार्गदर्शनात अंकिता सांगोडे, ज्योती गोमासे, नेहा सावरकर, हेमा पाटील, प्रशांत दांडेकर, प्रवीण पैघाम, महेश त्रिवेदी यांनी पार पाडले़
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Donation by donors donated to national work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.