डॉक्टरांच्या हलगर्र्जीने गर्भातच अर्भकाचा मृत्यू

By Admin | Updated: July 15, 2014 00:06 IST2014-07-15T00:06:36+5:302014-07-15T00:06:36+5:30

प्रसूतीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने सदर महिलेच्या गर्भाशयाची पिशवी फाटली. यात तिच्या बाळाचा मृत्यू झाला असून तिचे आरोग्यही

Doctor of Hormones, Infant Deaths in the Fetus | डॉक्टरांच्या हलगर्र्जीने गर्भातच अर्भकाचा मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्र्जीने गर्भातच अर्भकाचा मृत्यू

वर्धेतील घटना : गर्भाशयशही फाटले
वर्धा : प्रसूतीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने सदर महिलेच्या गर्भाशयाची पिशवी फाटली. यात तिच्या बाळाचा मृत्यू झाला असून तिचे आरोग्यही धोक्यात आल्याचा आरोप महिलेच्या नातलगांनी केला आहे. ही बाब आपल्या अवाक्याबाहेर गेल्याचे लक्षात आल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेवर तात्पुरता औषधोपचार करून सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ पाठविल्याचाही आरोप आहे.
वर्धेतील रामनगर परिसरातील जयश्री राजेंद्र झाडे हिला शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसुतीकरिता दाखल करण्यात आले होते. यापूर्वी तिच्या दोन प्रसुती झाल्या ही तिची तिसरी वेळ होती. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिला प्रसुती वेदना होत असतानाही तिच्याकडे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकांनी तिला प्रसूतीकरिता आवश्यक असलेल्या गोळ्या दिल्या, तरीही तिची प्रसूती झाली नाही. यात रविवारी प्रसूतीविभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचे सिझर करण्याचा निर्णय घेतला. तिला शस्त्रक्रिया कक्षात नेण्यात आले. यावेळी तपासणी केली असता तिची गर्भाशयाची पिशवी फाटली असल्याचे निदर्शनास आले. यातच तिच्या बाळाचा मृत्यू झाला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची गर्भपिशवी शिवून तिला परत प्रसूती विभागात पाठविले. सोमवारी सकाळी अचानक तिची प्रकृती खालावली. तिला श्वास घेण्यास अडचण झाल्याने तिला अतिदक्षता विभागात नेण्यात आले. तिची प्रकृती खालावतच जिल्हा सामान्य रुग्णाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला सेवाग्राम रुग्णालयात हलविले. सदर महिलेवर वेळीच उपचार होणे अपेक्षित होते, तेथेही वेळेवर वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते.(प्रतिनिधी)

Web Title: Doctor of Hormones, Infant Deaths in the Fetus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.