शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

बाबासाहेबांसारखी चिकित्सक वृत्ती अंगिकारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:30 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्वज्ञान, संस्कृती, इतिहासातील सूक्ष्म बाबी समजून घेण्यासाठी अनेक भाषा अवगत केल्या होत्या. मराठी त्यांची मातृभाषा होती; पण त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व अनन्य साधारण होते.

ठळक मुद्देआ.ह. साळुंखे : डॉ. आंबेडकरांच्या विचारधारेतून मिळणाऱ्या प्रेरणा विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्वज्ञान, संस्कृती, इतिहासातील सूक्ष्म बाबी समजून घेण्यासाठी अनेक भाषा अवगत केल्या होत्या. मराठी त्यांची मातृभाषा होती; पण त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व अनन्य साधारण होते. त्यांनी फ्रेंच राज्यक्रांती, युरोप समजून घेण्यासाठी फ्रेंच, ग्रीक, जर्मन या भाषांचा अभ्यास केला. त्या शिकून घेतल्या. यामुळे ते जगातील सर्वोत्तम ज्ञान आत्मसात करू शकले. बाबासाहेबांपासून प्रेरणा घेत आजच्या तरुणांनी जगाची भाषा आत्मसात करावी, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त पोलीस ग्राऊंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने शनिवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यता आले होते. यावेळी ते ‘बाबासाहेबांच्या विचारधारेतून मिळणाºया प्रेरणा’ विषयावर व्याख्यान देत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ. पंकज भोयर तर अतिथी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम, ज्येष्ठ पत्रकार विनोद राऊत, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रमोद राऊत, संयोजक विशाल रामटेके उपस्थित होते.डॉ. आंबेडकरांनी केलेल्या कामाचे स्वरूप व्यापक आहे. ते काम लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे, यावर भर देताना डॉ. साळुंखे म्हणाले की, बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील १० वर्षे शेतकºयांसाठी खर्ची घातले; पण त्याबद्दल अनेकांना काहीच माहिती नाही. शेतकºयांसाठी त्यांनी अनेक परिषदा घेतल्या. त्यावेळच्या प्रांतिक असेंब्लीवर बाबासाहेबांच्या नेतृत्वात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. १९३७ मध्ये त्यांनी स्वतंत्र मंजूर पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या विजयी उमेदवाराच्या सभेत बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की, आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात प्रारंभीपासून फक्त अस्पृश्य समाजाच्या हिताचा विचार करीत काम केले; पण बदलत्या काळाची गरज लक्षात घेत माझ्या कामाची दिशा बदलली आहे. मी सर्व कष्टकरी, मजूर, कामगार, शेतकरी यांच्या हितासाठी काम करायचे ठरविले आहे. यामुळे बाबासाहेबांच्या कुठल्याही कामात संकुचितपणाला वाव नव्हता, हे स्पष्ट होते. तरुणांना जगभर संधी आहे. यासाठी त्यांनी बाबासाहेबांचा आदर्श घेत वेगवेगळ्या भाषा अवगत कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.प्रास्ताविकातून प्रमोद राऊत यांनी डॉ. आंबेडकरांच्या जयंती उत्सवाला ‘विचार व प्रबोधनाचा उत्सव’ असे स्वरूप देता आले, याबद्दल समाधान व्यक्त केले. ही परंपरा कायम ठेवू, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी न.प. कर निरीक्षक रवी जगताप, पराग पोटे, कार्यकारी अभियंता अनिल तेलंग, नियोजन अधिकारी टेंभूर्ण, डॉ. अमोल लोहकरे, बाबासाहेब देशमुख, डॉ. पुरुषोत्तम मडावी, हेमंत पावडे यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय वसंत भगत, परवेज खान यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य केले.