व्यसनी मुलांशी विवाह करू नये
By Admin | Updated: September 24, 2014 23:40 IST2014-09-24T23:40:46+5:302014-09-24T23:40:46+5:30
घराघरांतून निर्माण होत असलेल्या अंधश्रध्देला हद्दपार करूया अशी शपथ तरूणांनी घेतली तरच निरामय समाज आपण निर्माण करता येईल. दारू पिणाऱ्या व तंबाखूचे सेवन करणाऱ्या तरूणांशी

व्यसनी मुलांशी विवाह करू नये
मार्गदर्शन : गजेंद्र सुरकार यांचे विद्यार्थिनींना आवाहन
वर्धा : घराघरांतून निर्माण होत असलेल्या अंधश्रध्देला हद्दपार करूया अशी शपथ तरूणांनी घेतली तरच निरामय समाज आपण निर्माण करता येईल. दारू पिणाऱ्या व तंबाखूचे सेवन करणाऱ्या तरूणांशी विवाह न करण्याचा निर्धार मुलींनी केला तर व्यसनाधिनतेला चाप बसेल. याची सुरुवात करणे काळाची गरज आहे, असे आवाहन अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे पदाधिकारी गजेंद्र सुरकार यांनी केले.
स्थानिक यशवंत महाविद्यालय येथे मराठी विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या वतीने महिला व अंधश्रध्दा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांची जाण व्हावी या हेतूने आयोजित कार्यक्रमात सुरकार यांनी ओघवत्या भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. त्यांनी मराठीचे कार्यक्षेत्र कोणते यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. न. ह. खोडे यांनी केले. उन्हाळी २०१३ परीक्षेत विद्यापीठातून प्रथम आलेल्या अश्विनी पाबळे हिला मान्यवरांनी सन्मानित केले.(स्थानिक प्रतिनिधी)