आधारची सक्ती नको

By Admin | Updated: May 15, 2015 01:58 IST2015-05-15T01:58:19+5:302015-05-15T01:58:19+5:30

महसूल विभाग, गॅस सिलिंडर, बँकेचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्डची मागणी केली जाते.

Do not force the base | आधारची सक्ती नको

आधारची सक्ती नको

मागणी : शासकीय योजनांत आवश्यक
पुलगाव : महसूल विभाग, गॅस सिलिंडर, बँकेचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्डची मागणी केली जाते. अनेकांनी आधार नोंदणी करुनही कार्ड मिळालेले नाही. शिवाय आधार कार्डची सक्ती करु नये याबाबत न्यायपालिकेने निर्देश दिले होते. मात्र संबंधितांकडून आधार कार्डकरिता सक्ती करण्यात येत असल्याने नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडसर येत आहे.
शासकीय कार्यालयात आधार कार्डची सत्यप्रत मागण्यात येते. पुलगाव व परिसरातील काही नागरिकांना अद्याप आधार कार्ड मिळालेले नाही. तर काहींची नोंदणी झालेली नाही. यामुळे या नागरिकांकडून आधार ऐवजी अन्य ओळखपत्र सादर केले जाते. मात्र आधारचीच सक्ती होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय कामकाज आॅनलाईन झाले असले तरी सत्यप्रत नसल्याने समस्येत भर पडत आहे.
राशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, डोमासाईल व अन्य दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात आधार कार्ड मागण्यात येते. आधार कार्ड विनामुल्य काढण्याची मोहीम सुरू आहे. पण अजूनही शेकडो लोकांना आधार कार्ड मिळाले नाही. शिवाय न्यायालयाच्या निर्णयानुसार आधार कार्ड सक्तीचे नसल्याचा आदेश आहे. नागरिकांनी सादर केलेल्या अन्य ओळखपत्राला ग्राह्य धरीत योजनांचा लाभ देण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Do not force the base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.