शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कार्यालयात ‘दिवाळी फिव्हर’; कर्मचारी ‘नॉट हिअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 21:13 IST

दिवाळीला शनिवारपासून सुरुवात झाली. सोमवारी लक्ष्मीपूजन, मंगळवारी गायगोधन आणि बुधवारी भाऊबीज होती. त्यामुळे बुधवारपर्यंत सुट्या झाल्यानंतर गुरुवारपासून नियमित कार्यालये सुरू झाली. गुरुवार आणि शुक्रवारी या कार्यालयीन दिवसानंतर पुन्हा शनिवार आणि रविवारी सुट्या आल्याने बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या शनिवारपासून आठवड्याभराचा बेत आखला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी हा महत्त्वाचा सण असल्याने शासकीय अधिकारी व कर्मचारीही दिवाळी साजरी करण्याकरिता आपापल्या गावी निघून गेले. दिवाळीचा सण आटोपल्यानंतर गुरुवारपासून नियमित कामकाजाला सुरुवात होईल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती; पण, गुरुवार तर सोडा; शुक्रवारीही कार्यालयातील खुर्च्या रित्याच दिसून आल्याने शासकीय कार्यालयांतील ‘दिवाळी फिव्हर’ अजूनही कायम आहे.दिवाळीला शनिवारपासून सुरुवात झाली. सोमवारी लक्ष्मीपूजन, मंगळवारी गायगोधन आणि बुधवारी भाऊबीज होती. त्यामुळे बुधवारपर्यंत सुट्या झाल्यानंतर गुरुवारपासून नियमित कार्यालये सुरू झाली. गुरुवार आणि शुक्रवारी या कार्यालयीन दिवसानंतर पुन्हा शनिवार आणि रविवारी सुट्या आल्याने बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या शनिवारपासून आठवड्याभराचा बेत आखला. ते शनिवारपासूनच रजेवर गेले असून, अद्यापही कार्यालयात रुजू झाले नसल्याने गुरुवार आणि शुक्रवारी शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून आला. आता सोमवारपासूनच कार्यालयातील कामकाजाला गती येण्याची शक्यता आहे.

फक्त कार्यालय बंद राहता कामा नये ! - जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन, वित्त व लेखा विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग माध्यमिक यांसह इतरही विभागांमध्ये बोटांवर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित होते. अशीच परिस्थिती जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या कार्यालयातही दिसून आली. - बहुतांश अधिकारी  व कर्मचारी जिल्ह्याबाहेरील असल्याने ते दिवाळीनिमित्ताने आपापल्या गावाकडे निघून गेले. आता दोन दिवस शनिवार व रविवारची सुटी अनेकांनी मुक्काम वाढविला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत काम थांबले तरी चालेल; पण कार्यालय बंद राहता कामा नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. म्हणूनच कार्यालय उघडे करून काही कर्मचारीच कार्यालयात उपस्थित असल्याचे दिसून आले. या सर्वामध्ये कामानिमित्त आलेल्यांचा हिरमोड झाला.

कामकाज नाहीच, केवळ गप्पाच- दिवाळीकरिता गेलेले अधिकारी व कर्मचारी सुट्या संपूनही परतले नसल्याने सर्वसामान्यांच्या कामकाजाचे दिवाळे निघत आहे. जे कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते, त्यांतील मोजक्याच कर्मचाऱ्यांनी नियमित कामकाजाला सुरुवात केली. बहुतांश कर्मचारी आज गप्पागोष्टींमध्ये गुंग होते. काही मोबाईलमध्ये व्यस्त होते, तर काही कार्यालय परिसरातील किंवा बाहेरील कॅन्टीनमध्ये वेळ घालवीत असल्याचे पाहावयास मिळाले.

रिकाम्या खुर्च्या पहा, गावाकडे परत जा ! - सोमवारी लक्ष्मीपूजन असल्याने काही अधिकारी व कर्मचारी गेल्या शनिवारपासूनच सुटीवर गेले. त्यामुळे   गुरुवारपासून तरी कामकाज सुरळीत सुरू होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. त्यामुळे विविध कामांनिमित्त शेतकऱ्यांसह इतरही व्यक्ती गुरुवार आणि शुक्रवारी शासकीय कार्यालयामध्ये उपस्थित झाले; परंतु पुन्हा शनिवार आणि रविवारची सुटी असल्याने शुक्रवारीही कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. आजही अधिकारी व कर्मचारी नसल्याने नागरिकांना परत जावे लागले. 

दालनात टेबलावरील फाईललाही पंख्याची हवा!- जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये फेरफटका मारला असता बहुतांश विभागात विभागप्रमुखांसह निम्म्यापेक्षा अधिक कर्मचारी रजेवर होते. त्यामुळे कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांकरिता कार्यालयातील लाईट आणि पंखे सुरू करणे अपेक्षित होते; पण दोन ते तीन कर्मचाऱ्यांकरिता कार्यालयातील सर्वच पंखे व लाईट सुरू करून विजेची उधळपट्टी चालविल्याचे निदर्शनास आले. वित्त विभागात विभागप्रमुख दालनात उपस्थित नसतानाही त्यांच्या टेबलावरील फाईलला दालनातील पंखा हवा घालत होता आणि सर्व लाईट प्रकाश देत असल्याचे चित्र दिसून आले. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Governmentसरकार