दिव्यांग बांधवांनी दिली तहसीलदारांना गाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:13 IST2018-06-02T00:12:48+5:302018-06-02T00:13:02+5:30

दिव्यांगांच्या समस्या अनेक दिवसांपासून तशाच पडून आहेत. या समस्या मार्गी लावण्याकरिता अनेकवेळा आंदोलने झाली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे शुक्रवारी प्रहारच्यावतीने देवळी तहसील कार्यालय गाठून अनोखे आंदोलन करण्यात आले.

Divanang brothers gave tehsildars to the cow | दिव्यांग बांधवांनी दिली तहसीलदारांना गाय

दिव्यांग बांधवांनी दिली तहसीलदारांना गाय

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : त्वरित मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिव्यांगांच्या समस्या अनेक दिवसांपासून तशाच पडून आहेत. या समस्या मार्गी लावण्याकरिता अनेकवेळा आंदोलने झाली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे शुक्रवारी प्रहारच्यावतीने देवळी तहसील कार्यालय गाठून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिव्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जास्तीचे काम करावे लागत असल्यास आर्थिक नुकसान होवू नये, शिवाय आपणस जोडधंदा करता यावा, असे म्हणत आंदोलकांनी तहसीलदारांना चक्क गाय भेट दिली.
देवळी तालुक्यात दिव्यांगांच्या कोणत्याही समस्यांचे निराकरण झाले नाही. याबाबत विचारणा केली असता कर्मचारी नसल्यामुळे अडचणी जात असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. यामुळे दिव्यांगांच्या समस्यांचा डोंगर दिवसेंदिवस मोठा होत आहे. आपणास वारंवार माहिती मागुनही पं.स. व ग्रामपंचायत स्थरावरील ३ टक्के निधीचा खर्च करण्यात येत नाही. अपंगांना घरकूलमध्ये प्राधान्य दिले जात नाही. जि.प. अथवा शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायत स्तरावर सचिव दिव्यांगापर्यंत पोहचवित नाही. १४ व्या वित्त आयोगांतर्गत आराखडा मंजूर करतेवेळी दिव्यांगांना गृहीत धरुन एकही योजना तयार करण्यात आली नाही. पं.स. अंतर्गत येणाऱ्या विविध योजनामध्ये दिव्यांगाना त्यांच्या आरक्षणानुसार समावून घेत नाही. अशा असंख्य अडचणी आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग आम्हाला सकारात्मक निर्णय घेण्याच्या आश्वासनापलीकडे काहीही करीत नाही. शासन शेतकरी व गरिबांना शेतीला जोडधंदा नफ्याचा व्हावा म्हणून शेतकºयांना गाय, म्हैस, बकऱ्या व कोंबड्या देतात. त्याच धर्तीवर अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी जास्त वेळ जर काम करावे लागत असेल तर संघटना आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गाय भेट देत असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले. गायीमुळे आपणही जोडधंदा करून जास्तीचे उत्पन्न मिळवाल व दिव्यांगांच्या समस्यांची देऊन सोडवणूक कराल, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

Web Title: Divanang brothers gave tehsildars to the cow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.