मतदार संघातील रस्त्यांना जिल्हा प्रमुख मार्ग करा
By Admin | Updated: March 26, 2015 01:48 IST2015-03-26T01:48:24+5:302015-03-26T01:48:24+5:30
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी (रेल्वे) मतदार संघाचे आमदार समीर कुणावार यांनी ...

मतदार संघातील रस्त्यांना जिल्हा प्रमुख मार्ग करा
सिंदी (रेल्वे) : विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी (रेल्वे) मतदार संघाचे आमदार समीर कुणावार यांनी मतदार संघातील रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी केली़ या आधारे हमदापूर-आलगाव-सिंदी (रेल्वे), सिंदी-मांगली-दुधा, जुनोना-दहेगाव-हेलोडी, सिंदी ते दिग्रज, विखणी, जसापूर हे मार्ग जिल्हा मुख्य रस्त्यात समाविष्ट करावे़ शिवाय रस्त्यांचा दर्जा उन्नत करावा, अशी मागणी त्यांनी सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम मंत्रालय मुंबई यांना एका पत्राद्वारे केली आहे.
मतदार संघातील बरेच खराब झालेले रस्ते हे ग्रामीण मार्ग आहे़ सदर रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याने दुरूस्तीसाठी अत्यंत कमी निधी शासनाकडून जिल्हा जि़प़ प्रशासनाला उपलब्ध होतो. यामुळे सदर रस्ते जि़प़ बांधकाम विभागाकडून काढून शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत़ सदर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा द्यावा तसेच दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करावी, आवश्यक ठिकाणी रूंदीकरण व बांधकाम मंजूर करावे, अशी मागणीही कुणावार यांनी केली़
हमदापूर-आलगाव-शिवणगाव-सिंदी हा रस्ता इतर जिल्हा मार्ग क्र. ९९ लांबी, मांगली दुधा ब्राह्मणी हा नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्ऱ ७ ला जोडतो़ सदर रस्त्याची लांबी काढून २० ते २२ किमी येत असल्याने तसेच सिंदी मांगली व त्या पूढे नागपूरच्या औद्योगिक वसाहतीचे विस्तारीरकण होत असल्याने वाहतूक वाढली आहे. जुनोना-दहेगाव-हेलोडी, सिंदी ते दिग्रस, विखणी-जसापूरपर्यंत जिल्हा मार्ग क्र. १६ व नंतर ग्रामीण मार्ग क्र. २१ व १०२ याप्रमाणे आहे़ हे मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ ला जोडले जात असल्याने सदर रस्त्यांची लांबी २० किमीवर आहे़ हे दोन्ही मार्ग प्रमुख जिल्हा मार्गांत समाविष्ट करून दर्जा उन्नत करावे व आवश्यक रूंदीकरण करून बांधकाम करावे, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली़(प्रतिनिधी)