जिल्ह्यात १९.८० लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST2021-10-06T05:00:00+5:302021-10-06T05:00:03+5:30

शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे नेमके किती उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे. यंदा आर्वी तालुक्यात ११,०४१ हेक्टर, आष्टीत ८,७४५ हेक्टर, कारंजात १३,१२३ हेक्टर, सेलूत १७,२६१ हेक्टर, देवळीत १९,०१८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १८,६९३.५५ हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात २५,८६८.६० हेक्टर तर वर्धा तालुक्यात  १८,१३४.०६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. 

The district will produce 19.80 lakh quintals of soybean | जिल्ह्यात १९.८० लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होणार

जिल्ह्यात १९.८० लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यातही लवकर उत्पन्न येणारे सोयाबीन बियाण्यांची अनेक शेतकरी लागवड करतात. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ३१ हजार ८८४.२१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली, तर सध्या लवकर उत्पादन येणाऱ्या सोयाबीन पिकाच्या मळणीला शेतकरी गती देत असून, हेक्टरी १० ते १२ पोतींचा उतारा येत आहे. तर उर्वरित सोयाबीन पीक सध्या वेळीच कसे सवंगत त्याची मळणी करता येईल यासाठी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक प्रयत्न करीत आहे. यंदा जिल्ह्यात १९ लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. पण शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे नेमके किती उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे. यंदा आर्वी तालुक्यात ११,०४१ हेक्टर, आष्टीत ८,७४५ हेक्टर, कारंजात १३,१२३ हेक्टर, सेलूत १७,२६१ हेक्टर, देवळीत १९,०१८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १८,६९३.५५ हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात २५,८६८.६० हेक्टर तर वर्धा तालुक्यात  १८,१३४.०६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. 

अवघ्या दोन महिन्यात झाली भावात घसरण
- ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल दहा हजारांवर पोहोचले होते. पण नंतर केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे सोयाबीनच्या भावात दिवसेंदिवस घसरण येत आहे. हिंगणघाट बाजारपेठेत मंगळवारी साेयाबीनला प्रति क्विंटल ३,००० ते ५,००१ रुपये भाव देण्यात आला.

३ हजार ९५० रुपये हमीभाव
n सायोबीनची शासकीय खरेदी जिल्ह्यात अजूनही सुरू झाली नसली तरी थोड्या प्रमाणात शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहे. यंदा शासनाने सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव दिला आहे.

पावसाने मोडले कंबरडे
- मध्यंतरी जिल्ह्यात उसंत घेत झालेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. काही ठिकाणी तर सोयाबीनला कोंब फुटली. यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होईल, असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात. असे असले तरी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी सोयाबीन सवंगणी तसेच मळणीच्या कामाला गती देत आहेत. यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे समाधानकारक उत्पन्न होईल असे चित्र बघावयास मिळत आहे.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा
 

 

Web Title: The district will produce 19.80 lakh quintals of soybean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती