कार्यालयातून जिल्हा विशेष लेखापरीक्षक अधिकारी बेपत्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:01:10+5:30

जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था या कार्यालयाच्या माध्यमातून विविध कामे मार्गी लावले जातात. परंतु, या कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून कार्यालय प्रमुखच कार्र्यालयात येत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. जिल्हा विशेष लेखापरीक्षक या नागपूर येथील नरेंद्रनगर येथे राहत असून त्या २३ मार्च पासून कार्यालयात आलेल्या नाहीत.

District Special Audit Officer disappears from office! | कार्यालयातून जिल्हा विशेष लेखापरीक्षक अधिकारी बेपत्ता!

कार्यालयातून जिल्हा विशेष लेखापरीक्षक अधिकारी बेपत्ता!

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांसह सहकार आयुक्तांकडे तक्रार : तीन महिन्यांपासून ऑफीसला नाहीच, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना मिळतेय बगल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था वर्धा या कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून महिला जिल्हा विशेष लेखापरीक्षक या येत नसल्याने या कार्यालयातील अनेक कामे खोळंबली आहेत. या प्रकरणी काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था या कार्यालयाच्या माध्यमातून विविध कामे मार्गी लावले जातात. परंतु, या कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून कार्यालय प्रमुखच कार्र्यालयात येत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. जिल्हा विशेष लेखापरीक्षक या नागपूर येथील नरेंद्रनगर येथे राहत असून त्या २३ मार्च पासून कार्यालयात आलेल्या नाहीत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने मुख्यालयी रहावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
परंतु, त्या अजूनही कार्यालयात न येताच नियमित वेतन घेत असल्याने हा प्रकार जिल्हाधिकाºयांच्या सूचनांना बगल देणारा ठरत आहे. या प्रकरणी वेळीच दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनाही पाठविण्यात आली आहे.

शुक्रवारी केवळ कर्मचारीच होते हजर
लोकमत प्रतिनिधीने शुक्रवारी या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता कार्यालयात दोन्ही अधिकारी नसल्याचे पुढे आले.

अधिकची माहिती जाणून घेतली असता दोन्ही अधिकाऱ्यांबाबत दिशाभूल करणारीच माहिती देण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे.

बॉर्डर सील पॉर्इंटवर बोलावतात फाईली
जिल्हा विशेष लेखापरीक्षक या एखाद्या फाईल किंवा महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करायची असल्यास त्या नागपूर मार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या बॉर्डर सील पॉर्इंवर कर्मचाऱ्यांच्या हस्ते ही कागदपत्रे बोलावतात. नकार दिल्यास आपला वरिष्ठ अधिकारी आपल्यावर कारवाई करेल या भीतीने काही कर्मचारी हे कामही करीत असल्याचे तक्रारीत नमुद आहे.

अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यास नकार
जिल्हा विशेष लेखापरीक्षक आणि त्यांच्या कार्यालयाची बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांकाची विचारणा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना केली असता मोबाईल क्रमांक देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्यांची बाजू जाणून घेता आली नाही.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे क्रमप्राप्त आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. शिवाय चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

Web Title: District Special Audit Officer disappears from office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.