जिल्ह्यात १७७ रुग्णांची नोंद

By Admin | Updated: February 3, 2015 22:59 IST2015-02-03T22:59:33+5:302015-02-03T22:59:33+5:30

धकाधकीच्या जीवनात कधी, कुणाला, कोणत्या रोगाची लागण होईल, हे सांगणे कठीण आहे. याच जीवनशैलीत अनेकांना विविध व्यसने जडतात. या व्यसनांचा विपरित परिणाम त्यांच्या

The district records 177 cases | जिल्ह्यात १७७ रुग्णांची नोंद

जिल्ह्यात १७७ रुग्णांची नोंद

कर्करोग दिन : १० महिन्यांत १०,९५० महिलांची व्हीआयए चाचणी
रूपेश खैरी - वर्धा
धकाधकीच्या जीवनात कधी, कुणाला, कोणत्या रोगाची लागण होईल, हे सांगणे कठीण आहे. याच जीवनशैलीत अनेकांना विविध व्यसने जडतात. या व्यसनांचा विपरित परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो़ यातूनच कर्करोगासारखा जीवघेणा आजार जडत असल्याचे समोर आले़ जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोगाच्या १७७ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे़ कर्करोगाच्या रुग्णांसाठी बुधवारपासून (दि़४) विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे़
कर्करोग केवळ तंबाखू चघळल्यानेच होतो, असे नाही. कर्करोगाचे निदान लागताच तो मानवी शरिरात एकाच नव्हे तर अनेक प्रकारातून तो होत असल्याचे समोर आले आहे. यात महिलांना होणारा गर्भाशयाचा, स्तनाचा, मुखाचा असे कर्करोगाचे प्रकार आहेत. या आजारावर उपाय असले तरी उपचारात दिरंगाई वा दुर्लक्ष झाल्यास हा आजार जीवघेणा ठरणारा आहे. या अजारामुळे होत असलेले मृत्यू कमी करण्याकरिता शासनाच्यावतीने विविध उपाय आखले जात आहेत. त्याचा लाभ रुग्णांना घेणे गरजेचे आहे. शासनाद्वारे आॅगस्ट २०११ पासून कर्करोग निदानाचा कार्यक्रम वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात देण्यात आला. राज्यातील हा पहिला कार्यक्रम ठरला आहे़ वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळालेल्या यशानंतर तो राज्यातील अकरा जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये राबविण्यात आल्याची माहिती आहे़

Web Title: The district records 177 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.