जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात

By Admin | Updated: November 28, 2015 03:11 IST2015-11-28T03:11:11+5:302015-11-28T03:11:11+5:30

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे द्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय युवा महोत्सवा जिल्हा क्रीडा संकुल सभागृह वर्धा येथे पार पडला.

District Level Youth Festival | जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात

जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात


वर्धा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे द्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय युवा महोत्सवा जिल्हा क्रीडा संकुल सभागृह वर्धा येथे पार पडला. सदर महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी ओमकांता रंगारी, संगीततज्ज्ञ सुरेश चौधरी व दामोधर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर महोत्सवामध्ये लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका, शास्त्रीय गायन, वागन व नृत्य, वक्तृत्व इत्यादी आदी बाबींचा समावेश होता. जवळपास १०० युवक युवतींनी सदर महोत्सवात सहभाग नोंदविला. स्पर्धेची सुरूवात तबला वादनाने करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक गणेश ढोकपांडे, द्वितीय निखिल डुकरे तर तृतीय क्रमांक अभिषेक चारी यांनी प्राप्त केला. बासरी वादनात राहुल पोकळे याने प्रथम तर द्वितीय क्रमांक हर्षल खडसे यांनी पटकाविला. शास्त्रीय नृत्यामध्ये भरतनाट्यम या प्रकारात घनश्याम गुंडेवार, कथ्थक मध्ये चंद्रकांत सहारे व कुचिपूडी या प्रकारात गोरल पोहाने यांनी प्राविण्य प्राप्त केले. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आशना सिद्धीकी, द्वितीय क्रमांक रूपेश रेंघे तर तृतीय क्रमांक श्रृतिका ठाकूर हिने पटकाविला. लोकगित या सांघिक प्रकारात लोकधारा मंच वर्धा चा संघ विजयी ठरला. द्वितीय क्रमांकावर केसरीमल कन्या शाळा वर्धा तर तृतीय क्रमांकावर अनिकेत समाजकार्य महाविद्यालय वर्धा हा संघ राहिला. तसेच एकांकिका स्पर्धेत संजय गांधी स्मृती विद्यामंदिर हिंगणघाटचा संघ प्रथम क्रमांकावर राहिला. द्वितीय क्रमांक केसरीमल कन्या शाळा वर्धाने प्राप्त केला. लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक भारत विद्यालय हिंगणघाट यांनी तर द्वितीय क्रमांक संजय गांधी स्मृती विद्यामंदिर हिंगणघाटने पटकाविला. शास्त्रीय गायन स्पर्धेत सावेरी सोनी हिने प्रथम तर द्वितीय क्रमांक प्रवीण पेटकर याने पटकाविला.
सदर स्पर्धेतून प्रथम क्रमांक प्राप्त करणारे स्पर्धक नागपूर येथे होणाऱ्या विभागीय युवा महोत्सवात सहभागी होण्याकरिता पात्र ठरले आहे. स्पर्धेचे परीक्षण सुरेश चौधरी, दामोधर राऊत जीवन बांगडे, विकास काळे, शैलेश देशमुख, माधुरी काळे व ज्योती भागत यांनी केले. संचालन क्रीडा अधिकारी चारूदत्त नाकट यांनी केले. आभार चैताली राऊत यांनी मानले. यशस्वीतेकरिता घनश्याम वरारकर रवींद्र काकडे, क्रीडा मार्गदर्शन विजय ढोबाळे, हेमंत वडस्कर, रहाटे, बिसने यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: District Level Youth Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.