जिल्ह्याचा कोरोना रुग्ण रिकव्हरी दर ७५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST2020-06-07T05:00:00+5:302020-06-07T05:00:16+5:30

प्राप्त माहितीनुसार, ८ मे रोजी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल झालेल्या हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोविड अहवाल १० मे रोजी पॉझिटिव्ह आला. तर याच दिवशी वाशीम जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला व उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

District Corona Patient Recovery Rate 75% | जिल्ह्याचा कोरोना रुग्ण रिकव्हरी दर ७५ टक्के

जिल्ह्याचा कोरोना रुग्ण रिकव्हरी दर ७५ टक्के

ठळक मुद्देकोविडविरुद्ध लढा। दोन अ‍ॅक्टिव्ह रुग्ण घेताहेत उपचार

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आतापर्यंत २१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची नोंद वर्धा जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने घेतली असली तरी यापैकी बहूतांश रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. सदर रुग्णांपैकी एका रुग्णावर सध्यास्थितीत सिकंदराबाद येथे उपचार सुरू आहेत. तर १५ कोविड रुग्णांनी कोरोनाला धोबीपछाड देत त्यावर विजय मिळविला आहे. कोविड लढ्यात वर्ध्याचा रिकव्हरी दर सध्या ७५ टक्के असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, ८ मे रोजी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल झालेल्या हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोविड अहवाल १० मे रोजी पॉझिटिव्ह आला. तर याच दिवशी वाशीम जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला व उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. पण, त्याला न घाबरता कोविड युद्धासाठी तयारी केल्या वर्धा जिल्हा प्रशासन त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात केली. खबरदारीच्या उपाय योजनांची प्रभावी अंमलबजाणी केली. इतकेच नव्हे तर आर्वी तालुक्यातील ज्या भागात कोविड रुग्ण आढळला त्या हिवरा तांडा परिसरात कलस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणली. वाशीम येथील या रुग्णाला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान २९ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील रहिवासी असलेली आणि उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेली तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आली. या तरुणीने कोरोनावर विजय मिळविता; पण मेंदुज्वराने तिचा घात केला. २ जून रोजी उपचारादरम्यान या तरुणीची प्राणज्योत मालवली. मात्र, या तरुणीच्या निकट संपर्कात येऊन कोरोनाची लागण झालेल्या तरुणीच्याच कुटुंबातील तिघांनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १५ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून सध्या दोन कोविड अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर वर्धा जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्लेखनिय म्हणजे उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील एका रुग्णाला कोरोनामुक्त करून त्याला त्याच्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे.

१,१४० ऑक्सिजन सपोर्ट रुग्ण खाटा
जिल्ह्यातील पाच रुग्णालयात एकूण १ हजार १४० ऑक्सिजन सपोर्ट रुग्ण खाटा आहेत. सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय २००, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय ७५०, जिल्हा सामान्य रुग्णालय १००, उपजिल्हा रुग्णालय आर्वी ३० तर हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात ६० ऑक्सिजन सपोर्ट रुग्ण खाटांचा समावेश आहे.

तिघांचा मृत्यू
वर्धा जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील रहिवासी असलेल्या एकूण २१ कोरोना बाधितांची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यापैकी १५ रुग्ण सध्यास्थितीत कोरोनामुक्त झाले असून कोरोनाची लागण झालेल्या आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एक महिला, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील एक तरुणी व वाशीम येथील मूळ रहिवासी असलेला एका व्यक्ती असे एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: District Corona Patient Recovery Rate 75%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.