जिल्ह्याधिकाऱ्यांनी केली जलयुक्त शिवारातील कामांची पाहणी
By Admin | Updated: June 15, 2015 02:20 IST2015-06-15T02:20:19+5:302015-06-15T02:20:19+5:30
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत परिसरातील तीन तलावाचे खोलीकरण करून निघालेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला.

जिल्ह्याधिकाऱ्यांनी केली जलयुक्त शिवारातील कामांची पाहणी
शेतकऱ्यांचाही सहभाग : काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना
वायगाव(नि.) : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत परिसरातील तीन तलावाचे खोलीकरण करून निघालेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला. तसेच नाल्याचे खोलीकरणही करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी झालेल्या कामांची पाहणी करून अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता साहारे, तहसीलदार राहुल सारंग, तालुका कृषी अधिकारी राठोड, उपअभियंता उराडे, जलयुक्त शिवार समितीचे सदस्य माधव कोटस्थाने, सोमनाथे, सरपंच गणेश वांदाडे, मंडळ कृषी अधिकारी जावळकर, महसूल मंडळ अधिकारी मसराम, तलाठी एस.व्ही. जाधव, ग्राम विकास अधिकारी आर.डी.जामूनकर उपस्थित होते.(वार्ताहर)