जिल्हाधिकारी हिंगणघाट बाजार समितीत

By Admin | Updated: March 5, 2016 02:21 IST2016-03-05T02:21:17+5:302016-03-05T02:21:17+5:30

जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शुक्रवारी हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली.

District Collector Hinganghat Market Committee | जिल्हाधिकारी हिंगणघाट बाजार समितीत

जिल्हाधिकारी हिंगणघाट बाजार समितीत

समितीच्या व्यवहारासह योजनांची माहिती जाणून घेतली
हिंगणघाट : जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शुक्रवारी हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. यावेळी त्यांनी समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे होत असलेल्या शेतमालाच्या व्यवहाराबाबची माहिती घेतली. तसेच प्रत्यक्ष लिलाव कशा पद्धतीने होतो याबाबतचीही माहिती जाणून घेतली.
यावेळेस हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी भूगावकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी उपस्थित होते. अ‍ॅड. कोठारी यांनी समितीद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली. समितीद्वारे निर्माण करण्यात आलेल्या पायाभूत व उत्पादित सुविधा, धान्य लिलाव पद्धत, शेतमाल तारण योजनेची माहिती, शेतकरी निवास, ई-आॅक्शन धान्य लिलाव पद्धत, शेतकऱ्यांना एक रूपयात जेवणाची सुविधा, शेतकऱ्यांकरिता बस व्यवस्था, पांदण रस्त्यांचे मातीकाम, बैलमृत्यू व नैसर्गिक आपत्तीकरिता आर्थिक मदत, शेतकरी पाल्यांना लॅपटॉप, ५० टक्के अनुदानावर व्यावसायिक अभ्यासक्रम, बालिका बचाव योजना, ठिबक सिंचन योजना यासह इतरही विविध योजनांबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांना देण्यात आली. याप्रसंगी अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी समितीचे संचालक राजू मंगेकर, नगर परिषदेचे उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, किशोर दिघे, राजू अवचट, सचिव टी. सी. चांभारे, समितीचे कर्मचारी, व्यापारी, अडते, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: District Collector Hinganghat Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.