विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
By Admin | Updated: September 16, 2014 23:56 IST2014-09-16T23:56:01+5:302014-09-16T23:56:01+5:30
येत्या १५ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी व आर्वी या चारही मतदार संघातील १० लाख ३५ हजार ३०३ मतदार

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
वर्धा : येत्या १५ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी व आर्वी या चारही मतदार संघातील १० लाख ३५ हजार ३०३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. उल्लेखनीय, वर्धा विधानसभा मतदार संघात पहिल्यादांच ‘व्हीव्हीपॅट’ मशीनचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे मतदारांना आपले मत नेमक्या उमेदवाराला मिळाले वा नाही याची खातरजमा करता येणार आहे, अशी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
मतदार नोंदणी शेवटच्या टप्प्यात असून बुधवार मतदार नोंदणीचा शेवटचा दिवस असल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
आर्वी विधानसभा मतदार संघात २ लाख ४७ हजार ५६ नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १ लाख २७ हजार ८९२ पुरुष तर १ लाख १९ हजार १६४ मतदारांचा समावेश आहेत. देवळी मतदार संघात २ लाख ४६ हजार ८६३ एकूण मतदार संख्या असून यामध्ये १ लाख २९ हजार १३८ पुरुष तर १ लाख १७ हजार ७२० स्त्री मतदारांचा समावेश आहे. तसेच ५ इतर मतदारांचा समावेश आहेत. हिंगणघाट मतदार संघात २ लाख ५९ हजार ५७८ हजार ५४८ पुरुष तर १ लाख २३ हजार २९ महिला व एक इतर मतदारांचा समावेश आहेत. वर्धेत २ लाख ८१ हजार ८०६ मतदार संख्या आहेत. यामध्ये १ लाख ४४ हजार ७३७ पुरुष तर १ लाख ३७ हजार ६९ महिला आणि एक इतर मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी ९ लाख ५२ हजार मतदारांना छायाचित्र ओळखपत्र दिलेले आहे. याची टक्केवारी ९१.८८ आहे. इपिकची संख्या ९ लाख ५७ हजार ३२० असून याची टक्केवारी ९२.४७ आहे. (जिल्हा प्रतिनिधी)