शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

संकटकाळात झाले ‘रेकॅार्ड ब्रेक’ पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 05:00 IST

खरीब किंवा रबी हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी विविध बँकांचे उंबरठे झिजवून पीककर्ज मिळवितात. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला त्यासाठी सुरुवातीला विविध कार्यालयात जावून आवश्यक कागदपत्र गोळा करावे लागतात. हीच कागदपत्रं सादर केल्यावर कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यावर यापूर्वी कुठले कर्ज आहे काय, याची शहानिशा केल्यावरच त्याला पीककर्ज योजनेस पात्र ठरवून त्याच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वळती केली जाते.

ठळक मुद्देमहात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा परिणाम : ७० हजार १५१ शेतकऱ्यांना मिळाले ७३८.९४ कोटी

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील सहा आर्थिक वर्षांचा विचार केल्यास यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात सर्वाधिक पीककर्ज वितरित झाल्याची नोंद अग्रणी बँकेने घेतली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातील ७० हजार १५२ शेतकऱ्यांना विविध बँकांकडून पीककर्ज म्हणून ७३८.९४ कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा कर्जमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानेच सर्वाधिक पीककर्ज वितरित झाल्याचे सांगण्यात आले.खरीब किंवा रबी हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी विविध बँकांचे उंबरठे झिजवून पीककर्ज मिळवितात. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला त्यासाठी सुरुवातीला विविध कार्यालयात जावून आवश्यक कागदपत्र गोळा करावे लागतात. हीच कागदपत्रं सादर केल्यावर कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यावर यापूर्वी कुठले कर्ज आहे काय, याची शहानिशा केल्यावरच त्याला पीककर्ज योजनेस पात्र ठरवून त्याच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वळती केली जाते. जिल्ह्यात अडीच लाखांच्यावर शेतकरी असून, बहुतांश शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकेकडून पीक कर्ज घेतात. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये वर्धा जिल्ह्याला पीककर्ज वाटपाचे १०२८.९६ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी जिल्ह्यातील तब्बल ७० हजार १५२ शेतकऱ्यांना पीककर्जापोटी ७३८.९४ कोटींची रक्कम वितरित केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या आर्थिक वर्षात कोरोनामुळे अनेकांचे कंबरडे मोडले असताना पीककर्ज वेळीच मिळाल्याने दिलासा मिळाला.

अन् कर्जखाते झाले निल महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्तीची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांचे बँक खाते वेळीच निल झाले. अशातच रितसर अर्ज सादर करून अनेक शेतकऱ्यांनी पीककर्जाची मागणी केली. शेतकऱ्यांवर कुठलाही कर्जाचा बोझा न राहिल्याने बँकांनाही शेतकऱ्यांना पीककर्ज वेळीच वितरित करता आल्याचे सांगण्यात आले. 

५२ हजार शेतकऱ्यांना मिळाला कर्जमुक्तीचा लाभमहाविकास आघाडी सरकारने जाहीर करीत प्रत्यक्ष कृतीत आणलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील तब्बल ५२ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनातील जिल्हा उपनिबंधक विभागाने घेतली आहे.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाली. इतकेच नव्हे तर बँकांकडून एकाच वेळी कर्जाच्या परतफेडबाबत विविध योजना राबविण्यात आल्या. या दोन्ही बाबींमुळे शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज मोठ्या प्रमाणात निल झाले. त्यामुळेच यंदा पीककर्ज योजनेच्या लाभासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र ठरले. फेब्रुवारी अखेरपर्यंत ७० हजार १५२ शेतकऱ्यांना पीककर्जापाेटी ७३८.९४ कोटींची रक्कम वितरित करण्यात आली आहे.- वैभव लहाने, प्रबंधक, अग्रणी बँक, वर्धा.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज