तीन महिन्यांत साडेचौदा हजार मेट्रीक टन तांदळाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:01 IST2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:01:12+5:30

दोन्ही गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यात ४ हजार ७७१ मेट्रीक टन, मे महिन्यात ४ हजार ८३५ तर जून महिन्यात ४ हजार ९४७ मेट्रीक टन तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. या तिन्ही महिन्यांमध्ये लाभार्थ्यांना १४ हजार ५५३ मेट्रीक टन तांदूळ मोफत मिळाला असून आता या तांदळाची दहा रुपये प्रतिकि लो किंवा दोन किलो तांदळाच्या मोबदल्यात एक किलो ज्वारी, या पद्धतीने नियमबाह्य विक्री सुरु झाली आहे.

Distribution of fourteen and a half thousand metric tons of rice in three months | तीन महिन्यांत साडेचौदा हजार मेट्रीक टन तांदळाचे वितरण

तीन महिन्यांत साडेचौदा हजार मेट्रीक टन तांदळाचे वितरण

ठळक मुद्देगरीब कल्याण योजना : गावोगावी लाभार्थ्यांकडूनच होताहेत विक्री, विनापरवानाधारक व्यापारी ग्रामीणसह शहरी भागातही सक्रीय

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला. हाताला काम नसल्याने धान्यकोंडी होण्याची शक्यता बळावली होती. त्यामुळे सर्वांना दोन वेळेचे जेवण मिळावे म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गट कुटुंबांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे आठही तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यात १४ हजार ५५३ मेट्रीक टन तांदळाचा वाटप करण्यात आला. पण, लाभार्थ्यांनी या मोफतच्या तांदळाची विक्री सुरु केल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये एकूण ८५३ स्वस्त धान्याची दुकाने असून जिल्ह्यातील १० लाख ७३ हजार १९२ लाभार्थ्यांना नियमित धान्यासोबतच मोफतच्या पाच किलो तांदळाचाही लाभ देण्यात आला आहे. यात ८ लाख ६१ हजार ४५८ लाभार्थी प्राधान्य गट तर २ लाख ०३ हजार ७३४ लाभार्थी अंत्योदय गटातील आहे.
एप्रिल महिन्यांपासून पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना तांदळाचे मोफत वितरण करण्यात आले आहे. या दोन्ही गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यात ४ हजार ७७१ मेट्रीक टन, मे महिन्यात ४ हजार ८३५ तर जून महिन्यात ४ हजार ९४७ मेट्रीक टन तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. या तिन्ही महिन्यांमध्ये लाभार्थ्यांना १४ हजार ५५३ मेट्रीक टन तांदूळ मोफत मिळाला असून आता या तांदळाची दहा रुपये प्रतिकि लो किंवा दोन किलो तांदळाच्या मोबदल्यात एक किलो ज्वारी, या पद्धतीने नियमबाह्य विक्री सुरु झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा कुठलाही परवाना नसलेले व्यापारी गावागावात सक्रीय झाले आहे. बऱ्याच लाभार्थ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासूनच तांदळाची विक्री सुरु केल्याचे बोलेले जात आहे.
लाभार्थ्यांकडून खरेदी केलेले हेच तांदूळ फिल्टर करुन २५ ते ३० रुपये दराने खुल्या बाजारात विकल्या जात आहे. आता पाच किलो तांदळाऐवजी जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतल्याने आता तांदळा सोबतच गव्हाचीही लाभार्थ्यांकडून विक्री होण्याची शक्यता असल्याने शासकीय धान्याचा हा गैरवापर थांबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

१४ जणांचे परवाने निलंबित
कार्डधारकांना वेळेवर धान्य न देणे, लाभार्थ्यांच्या वाट्यापेक्षा कमी धान्य देणे अशा असंख्य तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या. या तक्रारीच्या आधारे चौकशी करुन एप्रिल महिन्यात ६, मे महिन्यात ३ तर जून महिन्यात ५ अशा एकूण १४ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. ते दुकान दुसºयाला हस्तांतरीत करुन नियमित धान्यवाटप सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

शासनाकडून आता पाच किलो तांदळाऐवजी दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिले जात आहे. तांदळाची काही लाभार्थ्यांकडून विक्री होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे कार्डधारकांकडून अवैधरित्या धान्य खरेदी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल. त्यादृष्टीने आम्ही कारवाईला प्रारंभही केलेला आहे.
रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Distribution of fourteen and a half thousand metric tons of rice in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.