वर्धागंज डाक कार्यालयात तोडफोड
By Admin | Updated: June 9, 2014 23:46 IST2014-06-09T23:46:04+5:302014-06-09T23:46:04+5:30
येथील रेल्वे स्थानकासमोर असलेले वर्धागंज डाक कार्यालय उघडण्याकरिता आलेल्या पोस्ट मास्तरला चार जणांनी मारहाण केली. शिवाय कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना सोमवारी सकाळळी

वर्धागंज डाक कार्यालयात तोडफोड
पोस्ट मास्तरला मारहाण : तिघांना अटक, एक फरार
वर्धा : येथील रेल्वे स्थानकासमोर असलेले वर्धागंज डाक कार्यालय उघडण्याकरिता आलेल्या पोस्ट मास्तरला चार जणांनी मारहाण केली. शिवाय कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना सोमवारी सकाळळी ९.१५ वाजता घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एक मारेकरी अद्याप फरार आहे.
हे कार्यालय असलेल्या ठिकाणी अनेक अवैध व्यवसाय सुरू असतात. या कार्यालयाच्या वर्हांड्यात रात्रीच्यावेळी मद्यपींची मैफल सजत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. अशात पोस्टमास्तर राजेश कांबळे हे सोमवारी सकाळी नित्याप्रमाणे कार्यालय उघडण्याकरिता आले असता त्यांच्यावर काही युवकांनी अचानक हल्ला चढविला. त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या कार्यालयात शिरून मारेकर्यांनी साहित्याची फेकाफेक केली. मारहाण होत असल्याचे लक्षात येताच कांबळे यांनी थेट रेल्वे पोलीस ठाणे गाठले. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून साहित्याची फेकाफेक करीत असलेल्या तिघांना पकडले. तर त्यांच्या सोबत असलेला अन्य एक फरार झाला आहे.
या प्रकरणाची तक्रार पोस्टमास्तर कांबळे यांनी शहर ठाण्यात केली. शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत याप्रकरणी भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. शिवाय रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तिघांना शहर ठाण्याच्या कारागृहात रवाना केले. निलेश रेवनाथ भगत, अरविंद शंकर उईके, राजेश अशोक बरेनवार सर्व रा. गौरक्षणवॉर्ड अशी आरोपींची नावे असून हे तिघेही धुंदीत असल्याची माहिती ठाणेदार बुराडे यांनी दिली. त्यांची हल्ला करण्याचे कारण समजून आले नसून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)