वीरशैव मंडळाच्या सभेत विविध विषयांवर चर्चा
By Admin | Updated: November 10, 2015 02:56 IST2015-11-10T02:56:12+5:302015-11-10T02:56:12+5:30
वीर शैव मंडळाची कार्यकारिणी सभा घेण्यात आली. समाज बांधवांच्या उपस्थितीत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

वीरशैव मंडळाच्या सभेत विविध विषयांवर चर्चा
वर्धा : वीर शैव मंडळाची कार्यकारिणी सभा घेण्यात आली. समाज बांधवांच्या उपस्थितीत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष शिवलींग नगरे अध्यक्षस्थानी होते. विदर्भ विभाग सरचिटणीस अविनाश देमापुरे, वीरशैव सेवा मंडळ अध्यक्ष शामराव आनपान यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सभेला संबोधित करताना देमापुरे म्हणाले, लिंगायत वाणी या समाजाचा ओ.बी.सी. प्रवर्गात समावेश करण्यात आलेला आहे. याबाबत संबंधीत विभागाचे मंत्री आणि अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत इतर दहा लिंगायत जातीचा समावेश ओ.बी.सी. प्रवर्गात करण्याचा ठराव प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. लिंगायत समाजात दफनभूमी करीत प्रस्ताव मांडण्यात येणार असून याला त्वरीत मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. वर्धा, नागपूर, अमरावती व चंद्रपूर या जिल्ह्यांना यात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यांनतर ज्येष्ठ मार्गदर्शक रंगाप्पा कुबडे, श्यामराव आनपान, अध्यक्ष शिवलींग नगरे यांनी समाजाच्या एकजुटीसाठी व विकासासाठी सर्व संघटनांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
समाजबांधवांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारीणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी शिवलींग नगरे यांची निवड केली तर कार्याध्यक्ष वसंत मरडवार, उपाध्यक्ष प्राचार्य श्रीधर धामणकर, उपाध्यक्ष सुधीर कोठावळे, सरचिटणीस उल्हास कापसे, सहसचिव विलास मोकाशी, सहसचिव राजू बाष्टेवार, कोषाध्यक्ष सुरेश कापसे, महिला आघाडी प्रमुख सविता ढोले, उपप्रमुख अल्का नगरे, युवा आघाडी प्रमुख प्रशांत तेले, उपप्रमुख अभय नगरे, वधु-वर सूचक मंडळ प्रमुख सुरेश पट्टेवार, वीरशैव दर्शन मासिक प्रमुख शिवकुमार निलेवार, प्रसिद्धी प्रमुख सुभाष मोतेवार, कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र हिंगमिरे, सुधाकर कापसे, वामन उमाटे, अनंता बोनगीरवार, नागेश नगरे, प्राध्यापक वीणा धामणकर, शितल मोकाशी यांची निवड करण्यात आली. रंगाप्पा कुबडे, प्रा. ओंकार मरडवार, अरविंद डांगोरे, श्याम आनपान, शंकर बाष्टेवार यांचा सल्लागार समितीत समावेश केला. संचालन प्रशांत तेले यांनी केले तर आभार सुरेश कापसे यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)