शिक्षणाधिकाऱ्यांसोबत विविध समस्यांवर चर्चा

By Admin | Updated: May 9, 2016 02:09 IST2016-05-09T02:09:39+5:302016-05-09T02:09:39+5:30

जिल्हा परिषद कार्यालयात शिक्षण विभागात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विजयकांत दुबे नव्यानेच रुजू झाले.

Discussion on various issues with education officials | शिक्षणाधिकाऱ्यांसोबत विविध समस्यांवर चर्चा

शिक्षणाधिकाऱ्यांसोबत विविध समस्यांवर चर्चा

वर्धा : जिल्हा परिषद कार्यालयात शिक्षण विभागात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विजयकांत दुबे नव्यानेच रुजू झाले. त्यांच्याशी खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर व समस्यांवर चर्चा केली.
यावेळी संघाचे अध्यक्ष रवी शेंडे, सचिव सुरेशकुमार बरे, सहसचिव शालिक झाडे, यशवंत गडवार, संजय बावणकर, इकबाल शेख, महेंद्र झाडे, शैला जोगे, विद्या पिंपळगावकर, पुष्पा पराते, मारोती वाघमारे, निरंजन कांबळे, निर्मला नंदुरकर आदी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या व शिक्षकांच्या असणाऱ्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासंदर्भात निवेदन यावेळी शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी वेतन पथकाचे अधीक्षक, संजय बोकडे, वरिष्ठ सहायक प्रकाश बोबडे यांनी सहकार्य केले. आभार गडवार यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Discussion on various issues with education officials