सामाजिक न्याय मंडळात व्यसनमुक्ती विषयावर चर्चासत्र
By Admin | Updated: October 8, 2015 01:54 IST2015-10-08T01:54:46+5:302015-10-08T01:54:46+5:30
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद वर्धाच्या विद्यमाने व नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबई...

सामाजिक न्याय मंडळात व्यसनमुक्ती विषयावर चर्चासत्र
वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद वर्धाच्या विद्यमाने व नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबई वर्धा यांच्या सहकार्याने महात्मा गांधी व्यसन मुक्ती सप्ताहांतर्गत मंगळवारी सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय मंडळ वर्धा येथे व्यसनमुक्ती चर्चासत्र आयोजित करण्यात अले होते. आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष अधिकारी समाज कल्याण विभाग वर्धा येथील दीपा हेरोळे तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे गजेंद्र सुरकार, नशाबंदी मंडळ वर्धा येथील संघटक ज्ञानेश्वर येवतकर, सर्वोदय युवा वाहिनीचे अविनाश व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. वर्धा येथील अविनाश रामटेके मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक समाज कल्याण निरीक्षक प्रमोद खनवे यांनी केले. मार्गदर्शनात सुरकार म्हणाले, माणसावर व्यसनासारखा परंपरेचा पगडा आहे. भारतात वर्षभरात जेवढी दारू पिल्याजात नाही तेवढी ३१ डिसेंबरला पिल्या जाते. त्यामुळे व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी गरज त्यांनी व्यक्त केली.
ज्ञानेश्वर येवतकर यांनीही उपस्थितांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. तसेच वर्धा जिल्ह्यातील एकही विद्यालय व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाबाबत उपक्रम राबवत नाही अशी खंत त्यांनी व्क्त केली. तसेच उपस्थितांनी संपूर्ण वर्धा जिल्हा व्यसनमुक्त करण्यास सहकार्य करण्याचे आवाहनही केले.
सातपुते यांनी व्यसनापासून होत असलेल्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय वर्धा येथील विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दीपाली गोरडे यांनी केले. आभार समाज कल्याण निरीक्षक सुदेश कोंडे यांनी केले. यावेळी समाज कल्याणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)