शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरणारी सुधारणा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 21:59 IST

शिक्षकांचे वेतन व सेवा संरक्षण धोक्यात आणणाऱ्या प्रस्तावित सुधारणा तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर शिक्षकांनी निदर्शने केली.

ठळक मुद्देशिक्षक परिषदेची मागणी : जिल्हा परिषदेसमोर नोंदविला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षकांचे वेतन व सेवा संरक्षण धोक्यात आणणाऱ्या प्रस्तावित सुधारणा तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर शिक्षकांनी निदर्शने केली.महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी नियम १९८१ मधील अनुसूची क वगळण्याबाबत तसेच नियम ७ मधील पोटनियम १, २ ऐवजी सुधारीत पोटनियम अंतर्भुत करण्याबाबत ४ जुलै २०१९ च्या प्रकाशित मसुद्याला शिक्षकांनी विरोध दर्शविला. शिवाय जि.प. समोर शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग कार्यालय मंत्री अजय भोयर यांच्या नेतृत्त्वात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांना पाठविण्यात आले. राज्यातील खासगी शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना सेवा शाश्वती, सेवा सरक्षण व शिस्त प्राप्त करून देण्याच्या हेतुने विधी व न्याय विभागाने महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी विनियमन अधिनियम १९७७ विधान मंडळामध्ये मंजूर करून घेतला. या अधिनियमातील कलम १६ नुसार कायद्यातील उद्देशाने कार्यान्वय व पुर्तता करण्यासाठी नियमावली तयार करण्याचे अधिकार शिक्षण विभागाला प्रदान केले. या अधिकाराचा वापर करून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी नियमावली १९८१ विधी मंडळाची मान्यता घेवून प्रकाशित केली. त्यामध्ये अनुसूची क मधील तरतुदीनुसार राज्यातील शिक्षक कर्मचाºयांना वेतन व भत्ते मिळतात. परंतु, नियमावतील अनुसूचि क रद्द करण्याचा शासनाचा डाव असून राज्य शासनाच्या मर्जीप्रमाणे वेतन व भत्ते देण्याचा कट राज्य शासन आखत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ४ जुलै २०१९ प्रकाशित अधिसूचितील नियमांचा मसुदा क्र.२ अन्वये नियम ७ मधील परिनियम १ व २ ऐवजी अंतर्भुत करण्यासाठी प्रकाशित केलेले पोटनियम १ व २ ला निवदेनातून स्पष्ट आक्षेप घेण्यात आला. हे दोनही प्रस्तावित पोटनियम तसेच मसुदा क्र.३ मधील सुधारीत प्रस्ताव शिक्षक कर्मचाºयावर अन्याय करणारे असून शिक्षकांची सेवा शाश्वती व सेवा सरंक्षण संपुष्टात आणणारे आहे. शिक्षण क्षेत्रात वेठबिगारी व गुलामगिरी प्रस्तावित करणारी आहे. ही प्रस्तावित सुधारणा तात्काळ रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. ही प्रस्तावित सुधारणा रद्द करावी यासाठी शाळा शाळात आक्षेपांची स्वाक्षरी मोहीम राबविणार असून प्रस्तावित सुधारणा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनात सुनील गायकवाड, राऊळकर, संतोष महाजन, संदीप चांभारे, सुनील पल्हाळे, पुरूषोत्तम ओंकार, मोहमद शेख, प्रज्योत वनकर, भूषण डाहाके, जी. बी. सोनी, नरेश कुटेमाटे, मनोज बाचले, सचिन धोंगडे, डॉ. अनिस, दीपक कदम, पुंडलिक राठोड, ए.पी. वाशिमकर, पी.एच. राय, पी.बी. केंद्रे, साळवे, व्ही. एच. चांभारे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Teacherशिक्षकzpजिल्हा परिषद