वंचित चिमुकल्यांचा ढोल-ताशा निनादणार !

By Admin | Updated: January 19, 2017 00:29 IST2017-01-19T00:29:46+5:302017-01-19T00:29:46+5:30

शहरात प्रथमच लोकसंगीताच्या पारंपरिक वाद्यप्रकार ‘आरंभ ढोल ताशा पथक’ाच्या स्वरूपात करण्यात येत आहे.

Disadvantaged ChinuKalayana drum-tasha will deny! | वंचित चिमुकल्यांचा ढोल-ताशा निनादणार !

वंचित चिमुकल्यांचा ढोल-ताशा निनादणार !

 जगदंब प्रतिष्ठानचा नवोपक्रम : विकासापासून दूर समाज घटकांच्या उंचावल्या आशा
वर्धा : शहरात प्रथमच लोकसंगीताच्या पारंपरिक वाद्यप्रकार ‘आरंभ ढोल ताशा पथक’ाच्या स्वरूपात करण्यात येत आहे. यात ८ ते १० वर्षे वयोगटातील वंचित घटकातील मुलांना सहभागी करून घेतले जात आहे. जगदंब प्रतिष्ठानद्वारे राबविल्या जात असलेल्या या नवोपक्रमात सहभागी वंचित चिमुकल्यांचा ढोल-ताशा निनादणार आहे.
या वाद्य प्रकाराला राजदरबारी मानाचे स्थान आहे. भारतीय परंपरेत सार्वजनिक वा खासगी तथा पारिवारिक ठिकाणी शुभकार्याची सुरूवात मंगल वाद्याने होते. ‘ढोल ताशा’ हा वाद्यप्रकार शिरपेचच मानला जातो. मर्दानी ढंगात रूबाबदार राजेशाही पद्धतीने सादर केला जाणारा हा वाद्यप्रकार आहे. चिमुकल्यांच्या साथीने हा वाद्यप्रकार वर्धा शहरात प्रथमच सुरू केला जात आहे. ‘जगदंब प्रतिष्ठान’द्वारे हा उपक्रम राबविला जात आहे. या मर्दानी वाद्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे कळविण्यात आले आहे. समाजातील वंचित व गोर गरीब मुला-मुलींना यात सहभागी करून घेत त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ‘जगदंब प्रतिष्ठान’द्वारे आरंभ ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून केला जात आहे. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा आहे; पण आर्थिक वा तत्सम कारणांमुळे जी मुले शिक्षण घेऊ शकत नाही, ती शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च ‘जगदंब प्रतिष्ठान’कडून करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानला मिळणाऱ्या मानधनाचा वापर याच उपक्रमासाठी केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
‘जगदंब प्रतिष्ठान’द्वारे संस्कृती जपण्याच्या व प्रसाराच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. यात मर्दानी खेळांचे प्रशिक्षण, विविध प्रकारची शिबिरे, गडकिल्ले स्पर्धा, अभिनव कौशल्य शिबिर आदींचा समावेश आहे. नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे. आरंभ ढोल ताशा पथक व इतर उपक्रमांच्या आयोजनाची संधी उपलब्ध करून द्यावी. वादक लहान मुलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहनही प्रतिष्ठानने केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Disadvantaged ChinuKalayana drum-tasha will deny!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.