पद रिक्त : नागरिकांना करावी लागते पायपीटतळेगाव(श्याम.पंत) : शासकीय कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. याबाबत आदेश पारीत केला असून कारवाईचा उल्लेख आहे. असे असताना शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहण्यास बगल देऊन घरभाडे भत्त्याची उचल करतात. या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाचा भार सांभाळणारा शासकीय अधिकारी असलेले ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना गावातच राहणे आवश्यक असते. मुख्यालयी राहण्याच्या आदेशात दंडाची तरतुद आहे. मात्र कारवाई का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायती असून २५ ग्रामसेवक व २ ग्रामविकास अधिकारी कार्यभार पाहतात. यातील बोटावर मोजण्या इतकेच अधिकारी गावात राहतात. इतर मात्र काही तालुक्याच्या ठिकाणी तर काही जिल्हास्तरावरून ये-जा करतात. यामुळे कार्यालयात उशिरा येणे असे प्रकार घडतात. अनेकदा ग्रामस्थांना फोन करुन संपर्क करावा लागतो. अनेकदा उडवाउडवीची उत्तर दिल्या जाते. कर्मचारी मुख्यालयी राहिल्यास समस्याचे निराकरण करण्यात जाईल व गावाचा विकास साधण्यास मदत होईल. तसेच नागरिकांना वारंवार कार्यालयातून आल्यापावली परतावे लागणार नाही. या कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कारवाईची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.(वार्ताहर)
कर्मचाऱ्यांची मुख्यालयी राहण्यास दांडी
By admin | Updated: July 31, 2015 02:14 IST