लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ट्रेलरने उभ्या दुचाकीला चिरल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास सेलडोह शिवारात घडली. यात दुचाकीचा चुराडाच झाल्याने दुचाकी चालकाचे मोठे नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, बुट्टीबोरी ते तुळजापूर महामार्गा अंतर्गत येणाऱ्या सेलडोह येथील उड्डानपुलाचे काम सुरू आहे. खडकी येथील अतीक अली पटेल यांच्या मालकीची दुचाकी एम. एच. ३२ एस. ०९५० रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. उड्डानपुलाच्या बांधकामासाठी लोखंडी प्लेट घेवून जात असलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या आर. जे. ०९ जी. ए. ३३१४ क्रमांकाच्या ट्रेलरने दुचाकीला चिरडले. घटनेच्यावेळी परिसरात कुणी नागरिक नसल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु, दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद सिंदी (रेल्वे) पोलिसांनी घेतली आहे.
दिलीप बिल्डकॉनच्या कंटेनरने दुचाकीला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST
प्राप्त माहितीनुसार, बुट्टीबोरी ते तुळजापूर महामार्गा अंतर्गत येणाºया सेलडोह येथील उड्डानपुलाचे काम सुरू आहे. खडकी येथील अतीक अली पटेल यांच्या मालकीची दुचाकी एम. एच. ३२ एस. ०९५० रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. उड्डानपुलाच्या बांधकामासाठी लोखंडी प्लेट घेवून जात असलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या आर. जे. ०९ जी. ए. ३३१४ क्रमांकाच्या ट्रेलरने दुचाकीला चिरडले.
दिलीप बिल्डकॉनच्या कंटेनरने दुचाकीला चिरडले
ठळक मुद्देसेलडोह येथील घटना : परिसरात अपघाताचे सत्र सुरूच