दीक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्याच करण्यात आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:00 AM2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:00:22+5:30

प्राप्त माहितीनुसार, दीक्षा व विजेंद्र या दोघांचा सुमारे दोन महिन्यापूर्वी पे्रम विवाह झाला. शुक्रवारी सकाळी विजेंद्र हा नेहमी प्रमाणे खासगी उपहारगृहात कामावर गेला होता. तर दीक्षाचे सासू-सासरे हे जाम येथील आठवडी बाजारात साहित्य खरेदीसाठी गेले होते. दरम्यान घरी एकटी असलेल्या दीक्षाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या शुक्रवारपर्यंतच्या प्राथमिक तपासात पुढे आले.

Diksha did not commit suicide but she was killed | दीक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्याच करण्यात आली

दीक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्याच करण्यात आली

Next
ठळक मुद्देसमुद्रपूर पोलिसांनी नोंदविले बयाण । मृताच्या माहेरच्यांचा सासरच्यांवर घणाघाती आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : येथील वॉर्ड १३ मधील रहिवासी असलेल्या दीक्षा विजेंद्र वासेकर (२३) या विवाहितेने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. तर शनिवारी दीक्षाच्या माहेरच्यांचे बयाण पोलिसांनी नोंदविले. त्यात दीक्षाने आत्महत्या केली नसून तिची तिच्या सासरच्या मंडळीने संगणमत करून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, दीक्षा व विजेंद्र या दोघांचा सुमारे दोन महिन्यापूर्वी पे्रम विवाह झाला. शुक्रवारी सकाळी विजेंद्र हा नेहमी प्रमाणे खासगी उपहारगृहात कामावर गेला होता. तर दीक्षाचे सासू-सासरे हे जाम येथील आठवडी बाजारात साहित्य खरेदीसाठी गेले होते.
दरम्यान घरी एकटी असलेल्या दीक्षाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या शुक्रवारपर्यंतच्या प्राथमिक तपासात पुढे आले. सदर घटना उघडकीय येताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. शिवाय सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. दीक्षाने आत्महत्येसारखा कठोर निर्णय का घेतला हे अद्यापही गुलदस्त्यात असतानाच दीक्षा आत्महत्या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे.
दीक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप दिक्षाच्या नातलगांनी केला आहे. या संबंधी तक्रार देण्यासाठी दीक्षाचे माहेरकडील नातेवाईक रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत. दीक्षाने आत्महत्येसारखा कठोर निर्णय का घेतला याचा शोध समुद्रपूर पोलीस घेत आहेत. दीक्षाच्या माहेरच्यांनी सासरच्यांवरच आरोप केल्याने सदर प्रकरणाने सध्या नवीन वळण घेतले आहे. पोलिसांच्या तपासात पुढे काय निष्पन्न होते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
 

Web Title: Diksha did not commit suicide but she was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून