सुशीला नायर यांना आदरांजली
By Admin | Updated: December 27, 2015 02:34 IST2015-12-27T02:34:39+5:302015-12-27T02:34:39+5:30
म. गांधी आयुर्विज्ञान संस्थानच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. सुशीला नायर यांना १०१ व्या जयंतीदिनी शनिवारी मातृस्थळी आदराजंली वाहण्यात आली.

सुशीला नायर यांना आदरांजली
प्रार्थना सभेसह नाटिकेचे सादरीकरण
सेवाग्राम : म. गांधी आयुर्विज्ञान संस्थानच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. सुशीला नायर यांना १०१ व्या जयंतीदिनी शनिवारी मातृस्थळी आदराजंली वाहण्यात आली. सकाळी मातृस्थळी प्रार्थना आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी डॉ. सुशीला नायर यांच्या भाषणाची रेकॉर्डिंग ऐकविण्यात आली. त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगावर एका फोटो गॅलरीचे प्रदर्शन लावण्यात आले होते. शोभना रानडे, डॉ. जे.एम. दवे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचे डॉ. सुशीला नायर व महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान झाले. डॉ. नायर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यशाळा, सांस्कृतिक संध्या, ‘बापू की बेटी’ आदी कार्यक्रम व नाटिका सादर करण्यात आली. बालकाची देखरेख यावर एक सचित्र पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष धीरू मेहता, सचिव डॉ. बी.एस. गर्ग, अधिष्ठाता डॉ. के.आर. पातोंड, भैषज्य अधीक्षक डॉ. एस.पी. कलंत्री, डॉ. सुबोध गुप्ता, विभाग प्रमुख, डॉक्टर्स, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)