सरपंच व उपसरपंचाची वेगवेगळी सभा

By Admin | Updated: December 4, 2014 23:14 IST2014-12-04T23:14:22+5:302014-12-04T23:14:22+5:30

सरपंच व उपसरपंचांनी गावात वेगवेगळया सभा घेतल्याने ग्रामस्थही चकित झाले़ कायम नोंदीत ठेवावा, असा क्षण येथील ग्रामस्थांना शनिवारी (दि़२९) अनुभवता आला़

Different meetings of sarpanch and sub-panchayat | सरपंच व उपसरपंचाची वेगवेगळी सभा

सरपंच व उपसरपंचाची वेगवेगळी सभा

रसुलाबाद : सरपंच व उपसरपंचांनी गावात वेगवेगळया सभा घेतल्याने ग्रामस्थही चकित झाले़ कायम नोंदीत ठेवावा, असा क्षण येथील ग्रामस्थांना शनिवारी (दि़२९) अनुभवता आला़
एक पक्षीय सत्ता असलेल्या या ग्रा़पं़ मध्ये गत काही महिन्यांपासून कामकाजावरून तणाव निर्माण झाला आहे़ अवघे सहा महिने होत नाही तर अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची वेळ सरपंचावर आली. सरपंच नारायण कुऱ्हेकर यांच्यावर आली. सरपंचाविरूद्ध त्यांच्याच पक्षातील ११ पैकी उपसरपंच विलास खडके यांच्यासह नऊ सदस्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला़ सदर अविश्वास प्रस्तावावर आर्वी तहसीलदार मनोहर चव्हान यांनी रोजी प्रभारी ग्रामसेवक निमजे यांच्या उपस्थितीत ग्रा़पं़ मध्ये सदस्यांची बैठक घेतली़ या बैठकीत सदस्यांची मते जाणून घेण्यात आली़ नाट्यमयरित्या झालेल्या या सभेत काही ठरावही पारीत करण्यात आले.
नागरिकांच्या मागणीवरून झालेल्या सीेता भास्कर देऊळकर, राजेश सावरकर, अशोक अलोणे, माधव बमनोटे, वासुदेव सावरकर यांनी अन्य नागरिकांनी मांडलेल्या या ठरावामध्ये मंगरूळ पांदण रस्ता व देवळी पांदण रस्ता दुरूस्ती करणे, मंजूर वर्गासाठी रोजगार उपलब्ध करणे, प्लॉट मधील सिमेंंटीकरण, नवीन रस्ता बांधकाम दुसऱ्या ठेकेदाराकडे देणे, सन ११ पासून तर सन २०१४ ते २०१५ पर्यंत ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेली कामे जसे पाणी पुरवठा, वीज दुरूस्ती, विद्युत देयक, गावातील रस्ते, नळ व नाल्या दुरूस्तीच्या खर्चासह माहिती देणे, अनुपस्थितीत नऊ सभासदारांवर कारवाई करणे, यासह अन्य मागण्या ठरावात घेण्यात आल्या. काही मागण्यांवर नागरिक अक्तरखॉ पठाण यांनी आक्षेप नोंदविला. सभेला अंबादास भबुतकर, शालिक कुसराम, रमेश ढोले, विनायक कुऱ्हेकर, प्रकाश चाफले, संजय कनेरी, अनिल वानखडे, पंखराज तेलंग, भीमराव सावरकर, संजय राऊत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Different meetings of sarpanch and sub-panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.