जिल्ह्यात अतिसार पंधरवड्यालाच ‘अतिसार’

By Admin | Updated: August 1, 2014 00:24 IST2014-08-01T00:24:30+5:302014-08-01T00:24:30+5:30

अतिसारावर प्रतिबंध लाावण्याकरिता शासनाच्यावतीने अतिसार पंधरवडा जाहीर केला. दोन आठवड्यात राबविण्यात येत असलेल्या या पंधरवड्यात वाटण्यात येणार असलेल्या गोळ्या व ओआरएस पावडरचा

Diarrhea in the district is 'diarrhea' | जिल्ह्यात अतिसार पंधरवड्यालाच ‘अतिसार’

जिल्ह्यात अतिसार पंधरवड्यालाच ‘अतिसार’

औषधीच नाही : सव्वा लाख चिमुकल्यांना प्रतीक्षा
रूपेश खेरी - वर्धा
अतिसारावर प्रतिबंध लाावण्याकरिता शासनाच्यावतीने अतिसार पंधरवडा जाहीर केला. दोन आठवड्यात राबविण्यात येत असलेल्या या पंधरवड्यात वाटण्यात येणार असलेल्या गोळ्या व ओआरएस पावडरचा साठाच आला नाही. पंधरवडा सुरू होऊन पाच दिवसांचा कालावधी होत असला तरी जिल्ह्यात आवश्यक औषधीसाठा आला नसल्याने आरोग्य विभागाची तारांबळ उडत आहे.
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात अतिसारामुळे चिमुकल्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले. हे प्रमाण शंभर बालकांमागे ११ असे असल्याने यावर प्रतिबंध लावण्याकरिता शासनाच्यावतीने २८ जुलैपासून अतिसार पंधरवाडा जाहीर करण्यात आला. या पंधरवड्यात शुन्य ते पाच वयोगटातील चिमुकल्यांच्या घरांचा शोध घेत त्यांना ओआरएस पावडर व झिंक या गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पंधरवडा जाहीर करण्यापूर्वी आवश्यक औषधीसाठा जिल्ह्यात येणे आवश्यक होत; मात्र तसे झाले नाही.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत येत असलेल्या रुग्णालयांना औषधी पुरविण्याकरिता शासनाकडून केंद्रीय स्तरावर खरेदी केली जाते. तेथून आवश्यकतेनुसार जिल्ह्यात तो औषधीसाठा पुरविण्यात येतो. या पंरवड्याकरिता औषधीसाठा खरेदी करताना ोंधळ झाल्याने पंधरवडा सुरू झाला तरी जिल्ह्यात औषधीसाठा आला नाही. यामुळे शासनाच्या या पंधरवड्यादरम्यान जिल्ह्यात काय वाटाप करावा, असा प्रश्न आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. या पंधरवड्यात केवळ औषध वाटप करणे केवळ हाच उद्देश नाही तर या आजाराबाबत जनजागृती करण्याचाही उद्देश आरोग्य विभागाचा होता; मात्र औषधीसाठा आलाच नसल्याने शासनाने जाहीर केलेला उद्देश पूर्ण होत नसल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात हव्या १७.७५ लाख गोळ्या
शासनाच्या अतिसार पंधरवड्यात जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील सव्वा लाख चिमुकल्यांना या गोळ्या देण्यात येणार आहे. यात एका बालकाला या पंधरवड्यात १४ गोळ्या देण्यात येणार आहे. सोबतच ओआरएसचे पावडरही देण्यात येणार आहे. गोळ्यांचे प्रमाण व मुलांची संख्या याचे गणित केल्यास जिल्ह्यात १७ लाख ७५ हजार गोळ्यांची गरज आहे. यात शून्य ते सहा वयोगटातील मुलांना अर्धीच गोळी देण्यात येणार असल्याने संख्या कमी जास्त होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात २७ प्राथमिक आरोग्य केंद्र
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी २७ प्राथमिक आरोग्यकेंद्राकडे आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत जिल्ह्यात सव्वा लाख बालके येत आहेत. या बालकांना हे औषध पुरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या बालकांना पावसाळ्याच्या दिवसात अतिसाराची लागण होत असून त्यांना औषधी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

Web Title: Diarrhea in the district is 'diarrhea'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.