बुरकोणी येथे अतिसार नियंत्रण पंधरवडा

By Admin | Updated: August 3, 2014 00:15 IST2014-08-03T00:15:51+5:302014-08-03T00:15:51+5:30

अतिसार नियंत्रण पंधरवडा निमित्याने गावातील स्थानिक आशा स्वयंसेविकेमार्फत ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांकरिता क्षारसंजीवणी पाकिटे व हात धुण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.

Diarrhea Control Fortnight at the Burqoni | बुरकोणी येथे अतिसार नियंत्रण पंधरवडा

बुरकोणी येथे अतिसार नियंत्रण पंधरवडा

वर्धा : अतिसार नियंत्रण पंधरवडा निमित्याने गावातील स्थानिक आशा स्वयंसेविकेमार्फत ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांकरिता क्षारसंजीवणी पाकिटे व हात धुण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे प्राथमिक आरोग्य केंद्र बुरकोणी येथे उद्घाटन करण्यात आले.
आशा स्वयंसेविकेमार्फत ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांच्या कुटुंबास एक क्षारसंजीवनीचे पाकिटे वाटप करून त्यांच्या कुटुंबीयांना क्षारसंजीवनी करण्याबाबत आशा स्वयंसेविकांमार्फत प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगणार आहे. क्षारसंजीवनीचे महत्व सर्व पालकांनी समजून कुपोषित व अतिसार झालेल्या मुलांना योग्य व समतोल आहाराबाबत मार्गदर्शन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
अतिसार पंधरवडाकार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ओ.आर.टी. व झिंक कॉर्नर तयार केलेले असून त्याचा लाभ अतिसार झालेल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले. ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांचे कुटुंबास आशा स्वयंसेवका मार्फत ओ. आर. एस. पाकिटे वाटप करण्यात येत असून त्याचे जतन करून बालकास अतिसार झाल्यास आशांनी सांगितलेल्या ओ. आर. एस. चे क्षारसंजीवनची प्रात्यक्षिकाप्रमाणे द्रावण तयार करून बालकास योग्य प्रमाणात घेण्याबाबत व क्षारसंजीवनी तयार करतेवेळी वैयक्तीक स्वच्छता ठेवण्याबाबतचे मार्गदर्शन मातांना व पालकांना करण्यात आले.
अर्चना तिमांडे यांनी प्रत्येकांनी वैयक्तीक स्वच्छता, घरातील आतील व बाहेरील स्वच्छतेचे महत्व, खतखड्याची व सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, तसेच जेवणापुर्वी हात धुण्याचे आशा स्वयंसेवीका प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगणार असून जनतेने या बाबींकडे विशेष देण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी मातामृत्यु व बालमृत्यु कमी करण्याचे उद्दिष्ट कमी करण्याच्या दृष्टीने दरवर्षी एकूण बालमृत्युमध्ये अतिसारामुळे ११ टक्के बालमृत्यू होतात. सदर बालमृत्यु कमी करण्याकरीता अतिसार पंधरवडा निमित्याने सर्व ० ते ५ वर्ष वयोगटातील बालके असलेल्या पालकांच्या घरी आशा स्वयंसेविकांमार्फत क्षारसंजीवणी पाकिटे वाटण्याची मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी अतिथी म्हणून जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती उषा थुटे, पं.स. समिती सदस्य अर्चना तिमांडे, सरपंच विनोद चाफले, उपसरपंच सत्यपाल थुल व इतर कर्मचारी वर्ग व लाभार्थीचे पालक लाभार्थ्यांसह प्रा. आ. केंद्र बुरकोणी येथे हजर होते. संचालन हिंगणघाट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक यांनी केले तर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश मुरतकर यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य सहाय्यक सुरेश ताकसांडे, प्रा. यांनी आभार प्रदर्शन केले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Diarrhea Control Fortnight at the Burqoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.