सखी मंच सदस्यांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:28 IST2017-11-06T23:28:14+5:302017-11-06T23:28:27+5:30
लोकमत सखी मंचच्या हिंगणघाट येथील निवडक सदस्यांशी लोकमत एडीटोरिअल बोर्डाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी रविवारी संवाद साधला.

सखी मंच सदस्यांशी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : लोकमत सखी मंचच्या हिंगणघाट येथील निवडक सदस्यांशी लोकमत एडीटोरिअल बोर्डाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी रविवारी संवाद साधला.
हिंगणघाट येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले असताना आ. समीर कुणावार यांच्या निवासस्थानी त्यांनी सखी मंच सदस्यांशी संवाद साधत त्यांना मिठाई भेट दिली. यावेळी हिंगणघाट येथील सखी मंच सदस्या ज्योती हेमणे, प्रणीता तपासे, संगीता चंदनखेडे, ज्योती कोचाडे, माधवी नरड, शीतल गिरीधर यांच्यासह आ. समीर कुणावार यांच्या सौभाग्यवती श्रध्दा कुणावार व नागपूर येथील जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधूरी बोरा उपस्थित होत्या. यावेळी समाजातील सर्व घटकातील महिलांना लोकमत सखी मंच सोबत जोडावे, अशी सूचना त्यांनी केली.