आष्टीत भाजपाला नाकारले
By Admin | Updated: November 3, 2015 02:40 IST2015-11-03T02:40:26+5:302015-11-03T02:40:26+5:30
नगर पंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला आष्टीने प्रतिसाद दिला. १७ पैकी तब्बल १० जागांवर काँग्रेसला

आष्टीत भाजपाला नाकारले
आष्टी (शहीद) : नगर पंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला आष्टीने प्रतिसाद दिला. १७ पैकी तब्बल १० जागांवर काँग्रेसला बहुमत प्राप्त झाले. आता नगराध्यक्षपदाच्या रोस्टरकाडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वॉर्ड क्र. १ मध्ये काँग्रेसच्या साजेदा मुख्तार हसन (१२९), वॉर्ड २ मध्ये भाजपाचे मनिष ठोंबरे (१७४) मत, वॉर्ड ३ मध्ये काँग्रेसच्या जयश्री नरेंद्र मोकद्दम (१९३), वॉर्ड ४ मध्ये काँग्रेसच्या उज्वला दिलीप पोकळे (१३६), वॉर्ड ५ मध्ये काँग्रेसच्या अनिता शेखर भातकुलकर (२३९), वॉर्ड ६ मध्ये काँग्रेसचे शाहा फरीद सादिक (१११), वॉर्ड ७ मध्ये काँग्रेसचे अली रिजवाना परवीन (१२३), वॉर्ड ८ मध्ये काँग्रेसचे दिनेश सावरकर (१५९), वॉर्ड ९ मध्ये काँग्रेसच्या हमीदखाँ (१८१), वॉर्ड १० मध्ये काँग्रेसच्या मीरा मनोहर येणुरकर (१७६), वॉर्ड ११ मध्ये भाजपाच्या विमल नरेश दारोकर (१६५), वॉर्ड १२ मध्ये भाजपाच्या वंदना संजय दारोकर (२१६), वॉर्ड १३ मध्ये भाजपाचे अशोक विजयकर (१५०), वॉर्ड १४ मध्ये भाजपाचे अजय लेकुरवाळे (३१९), १५ मध्ये काँग्रेसचे ओंकार भोजने (१३४), वॉर्ड १६ मध्ये भाजपाचे सुरेश काळबांडे (२०८), तर वॉर्ड क्रमांक १७ मध्ये अपक्ष बाबाराव धुर्वे (१८७) यांनी विजय मिळविला.
वॉर्ड क्रमांक ८ मध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. भाजपाचे उमेदवार राजकुमार गुल्हाने यांना अवघी ३४ मते मिळाली. अपक्ष म्हणून उभे असलेले अतुल गुल्हाने यांनी १३९ मत घेतली. तर काँग्रेसचे दिनेश सावरकर यांना १५९ मत मिळाली. वॉर्ड क्र. १० मध्ये भाजपाच्या सुषमा प्रभाकर शिरभाते यांचा ७९ मतानी पराभव झाला. वॉर्ड १४ मध्ये काँग्रेसचे पाच वेळा निवडून आलेले डॉ. प्रदीप राणे यांचा ५२ मतांनी पराभव झाला. ही जागा काँग्रेसने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. वॉर्ड १७ मध्ये भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षाचे उमेदवार पराभूत होत अनिल धोत्रे आघाडीचे अपक्ष उमेदवार बाबाराव धुर्वे विजयी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभांगी आंधळे, सहायक अधिकारी सीमा गजभिये यांनी निकाल घोषित केले. ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.(प्रतिनिधी)