शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

धनगर जमातीला एस.टी. प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 17:01 IST

वर्धा येथे अन्नत्याग आंदोलन : हिंगणघाट येथे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : धनगर जमातीला एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी पंढरपूर, लातूर, नेवासा येथे ९ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र याची शासनाने दखल घेतली नाही. या उपोषणाला पाठिंबा म्हणून वर्धा येथे धनगर समाजबांधवांच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले तर हिंगणघाट येथे तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्रात धनगर जमात पिढ्यानपिढ्या मेंढपाळाचा व्यवसाय करीत आहे. १९५६ च्या अनु, जमातीच्या यादीत अनु, क्रमांक ३६ वर केवळ इंग्रजी मराठीच्या चुकीमुळे धनगर ऐवजी धनगड असे लिहिले गेले. धनगड नावाची जमात देशातच काय तर जगात कुठेच अस्तित्वात नाही. त्यामुळे ६८ वर्षांपासून धनगर समाज संविधानिक अधिकारापासून वंचित आहे. धनगड जमात राज्यात अस्तित्वात नाही, असे महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा लेखी स्वरूपात कळविले आहे. असे असले तरी अद्यापही शासनाने यात सुधारणा केली नाही. त्यामुळे अनु, जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर असलेली जमात धनगड नसून धनगर आहे हे असे स्पष्ट करीत, महाराष्ट्र शासनाने तात्काळ निर्णय घेऊन धनगर जमातीला एस.टी.चे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच पंढरपूर, नेवासा, लातूर येथे धनगर जमातीला एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. हे आंदोलन धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने स्थानिक लोकमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात करण्यात आले.

यावेळी वासुदेव राऊत, एस.जी. महाजन, गुणवंत बगाडे, सुनील धवते, गजेंद्र कापडे, किशोर ढवळे, राहुल ढगे, व्ही. व्ही. पातोंड, निलेश उघडे, चंदू शिंदे, डॉ. पंडित थोटे व अन्य उपस्थित होते. यावेळी आंदोलनाला राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) चे समीर देशमुख, काँग्रेसचे सुधीर पांगुळ, डॉ. अभ्युदय मेघे यांनी भेट देत प्रश्न जाणून घेतले. 

हिंगणघाट येथूनही आंदोलनाला पाठिंबा गत १४ दिवसांपासून सुरु असलेल्या पंढरपूर, लातूर, नेवासा येथील धनगर आरक्षण अंमलबजावणी आंदोलनाला हिंगणघाट लोकमाता अहिल्यादेवी होळकर समाज जागृती मंडळ व धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने पाठिंबा दिला. आरक्षण अंमलबजावणीवर तातडीने कारवार्ड करावी, अशी मागणी तहसीलदार शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गणेश उगे, उपाध्यक्ष यादव तुराळे, सचिव दिलीप बोभाटे, सहसचिव वासुदेवराव पडवे, कोषाध्यक्ष दादाजी नन्नुरे, डॉ. संदीप लोंढे, कृष्णा शेंडगे, सुधीर तिनघसे, हेमराज हुलके, भारत लोंढे, रमेश घोडे, देविदास ढोकणे, रामराव मेहत्री, विजय उगे, छत्रपती रोकडे, सुहास शिरपूरकर, कवडू शेळके, हरिश्चंद्र डोले, प्रशांत दवंडे, अरविंद मुंगल, बंडू लोंढे, रमेश उगे, विठ्ठल तुरके, महेंद्र पडवे, वसंतराव डोले, मधुकर भोयर, डॉ. दिगंबर येडे, संजय तुराळे, पंकज धवणे, अभिषेक उगे, स्नेहल चिडे, गौरव घोडे, धनराज टापरे, शुभम उगे, अभिमान चाहणंदकर, एस.बी. कापरे, यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :wardha-acवर्धा